घाणीमुळे बरांज व चिचोर्डीवासीयांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:08+5:302021-06-18T04:20:08+5:30

शहराबाहेरच्या मार्गावरच टाकली जाते घाण भद्रावती : भद्रावती क्षेत्रातील घाण बरांजकडे जाणाऱ्या मार्गांवर टाकली जात असल्यामुळे त्या मार्गाने ...

Contamination endangers the health of Baranj and Chichordi residents | घाणीमुळे बरांज व चिचोर्डीवासीयांचे आरोग्य धोक्यात

घाणीमुळे बरांज व चिचोर्डीवासीयांचे आरोग्य धोक्यात

Next

शहराबाहेरच्या मार्गावरच टाकली जाते घाण

भद्रावती : भद्रावती क्षेत्रातील घाण बरांजकडे जाणाऱ्या मार्गांवर टाकली जात असल्यामुळे त्या मार्गाने जाणे कठीण झाले असून बरांज व चिचोर्डी येथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहराबाहेरुन बरांज व चिचोर्डीला जाण्याकरिता वापरत असलेल्या मार्गावर सध्या कमालीचे घाणीचे साम्राज्य साचले आहे. या मार्गाचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात घाण फेकण्याकरिता करत आहेत. नगरपालिका क्षेत्रात असलेले भाजी व्यवसाय करणारे आपला उर्वरित खराब झालेला भाजीपाला, सडलेली फळे, मांस विकल्यानंतर वाचलेले वेस्ट, गटार साफ केल्यानंतर निघालेली घाण, रुग्णालयातील वापरलेली इंजेकशन, कापूस, निकामी औषध व इतर कचरा, मेलेली जनावर या सोबतच घरातून निघणारी सर्व प्रकारची घाण इथे फेकल्या जाते.

नगरपालिकेतर्फे कचरा व्यवस्थापनाकरिता घंटागाड्या, घनकचरा प्रकल्प, सफाई कामगार व स्वच्छतेच्या इतर गोष्टीचा समावेश आहे. या सर्व गोष्टी असूनही व्यापारी व नागरिक बेजबाबदारीने वागत असून घाण रस्त्यावरच टाकत आहे. या परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने अशांवर कारवाई करण्यात यावी. या मार्गावर अतिशय सुंदर नैसर्गिक वातावरण असल्यामुळे नागरिक सकाळी शुद्ध हवा घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात या मार्गांवर येतात. परंतु या घाणीमुळे स्वच्छ हवा मिळण्यापेक्षा नागरिकांना नाक दाबून येथे फिरावे लागत आहे. आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात काम करणे अवघड झाले आहे तर बरांज व चिचोर्डीवासीयांना नाईलाजाने या मार्गाने जावे लागत आहे. या घाणीमुळे सर्व लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोट

व्यापारी वर्गासाठी केरकचरा उचलण्यासाठी दिवसातून तीनदा घंटागाडीचे नियोजन नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे. तरीसुद्धा इतरत्र घाण, कचरा टाकून प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

-अनिल धानोरकर, नगराध्यक्ष न.प. भद्रावती.

===Photopath===

170621\img-20210617-wa0045.jpg

===Caption===

शहरा बाहेर टाक नाऱ्या घाणीमुळे बरांज व चिचोर्डी वासियांचं आरोग्य धोक्यात*.

Web Title: Contamination endangers the health of Baranj and Chichordi residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.