बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:15 AM2020-12-28T04:15:49+5:302020-12-28T04:15:49+5:30
आर्थिक व्यवहाराचे देवाणघेवाण सुरळीत व्हावे यासाठी शासन स्तरावरून कॅशलेस व्यवहारासाठी अनेक उपाय योजना केल्या गेल्या. याच माध्यमातून अनेकांनी नेट ...
आर्थिक व्यवहाराचे देवाणघेवाण सुरळीत व्हावे यासाठी शासन स्तरावरून कॅशलेस व्यवहारासाठी अनेक उपाय योजना केल्या गेल्या. याच माध्यमातून अनेकांनी नेट बँकिंग सारखे व्यवहार करण्यास सुरुवात केली. गोंडपिपरी येथील अजित कुमार जैन या वरिष्ठ व्यापाराने बँक ऑफ इंडिया शाखा गोंडपिपरी येथून नेहमी NEFT चे व्यवहार करीत होते. आता मात्र हेच व्यवहार करण्यास बँकेत गेले असता येथील कर्मचाऱ्यांनी आमच्या बँकेतून असले व्यवहार होत नसल्याने ज्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल त्याच बँकेतून हे व्यवहार केल्या जात असल्याचे सांगत हुज्जत घातली. सदर व्यापाराचे बँक ऑफ इंडिया शाखा वढोली येथे चालू खाते उघडले आहे. याअगोदर मात्र हेच व्यवहार गोंडपिपरी येथूनच रीतसर पार पडत होते मात्र हल्ली कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून बँकिंग व्यवहार करण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. खाते कुठल्याही ही शाखेत असले तरी ऑनलाइन व्यवहार या अगोदर याच बँकेतून केले असून आता मात्र हे कर्मचारी कामचुकारपणा करीत नाहक त्रास देत असल्याची माहिती अजित कुमार जैन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.