राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप

By admin | Published: January 7, 2015 10:50 PM2015-01-07T22:50:04+5:302015-01-07T22:50:04+5:30

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ उर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप सोमवारी कामगार

Context of National Convention on the Context | राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप

राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप

Next

चंद्रपूर : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ उर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप सोमवारी कामगार मनोरंजन केंद्र सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हरिश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष अशोक धमाने, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता अभय हरणे, कल्याण अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, मारोती आसुटकर, सेवकराम मिलमिले, जानीवंत घोडमारे, बाबुराव वाग्दरकर, डॉ. नवलाजी मुळे, डॉ. विठ्ठल बोरकुटे, कृषीभूषण शिवदास कोरे, मुकुंदा गरमडे महाराज आदी विचारपीठावर आसनस्थ होते.
याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले, हे साहित्य संमेलन श्री तुकारामदादा गीताचार्य जन्मशताब्दी वर्षाला समर्पित होते. सर्वांच्या सहयोगाने हे संमेलन ऐतिहासिक ठरल्याचे, ते म्हणाले. उपमुख्य अभियंता हरणे यांनी सर्वांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचारांची गरज असल्याचे म्हणत त्यांनी उर्जानगर शाखेचे कौतूक केले.
संमेलनाध्यक्ष आचार्य नारखेडे यांनी, ‘ग्राम हेची पवित्र मंदिर, त्यात मानव मूर्ती अतिसुंदर’ या राष्ट्रसंतांच्या विचाराप्रमामे वेगळ्या देवाच्या मंदिराऐवजी गावालाच मंदिराचे स्वरुप द्यावे. गावालाच भूवैकुंठ बनवावे, हे साध्य करण्याकरीता प्रत्येकालाच राष्ट्रसंतांच्या साहित्यनुरूप कृती करावी लागेल, विचाराला कृतीची जोड द्या, असे सांगितले.
कार्यक्रमात कर्मयोगी श्री तुकारामदादा गीताचार्य जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने साहित्य संमेलनाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल उर्जानगर शाखेचा आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीच्या वतीने गौरव करण्यात आला.
तर पुणे येथील नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेतर्फे सातत्याने गेल्या १२ वर्षांपासून राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन घेत असल्याबद्दल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीचा सत्कार करण्यात आला.
तसेच उर्जानगर वसाहतीतील गुणवंत कर्मचारी देवराव कोंडेकर, अनुप पाल, ब्रम्हानंद शेंडे, अरविंद जनबदकर, सुधीर मुंडे, पांडूरंग बोबडे आदींचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रसंत चित्रावली लावली होती. तसेच रवी धारणे यांचे अभंगाचे रंग आणि डोमा कापगते यांचा दीप ज्योती भजनावलीचे प्रकाशन झाले. शाखाध्यक्ष मोरेश्वर मडावी, शंकर दरेकर, नाना बावणे, फाले प्रशांत दुर्गे, राधेशाम राऊत, रामदास तुमसरे, नन्नावरे, उईके, बोबडे, राजेंद्र लांडे, पोईनकर व सर्व सदस्यांच्या सहकार्याने साहित्य दिंडी निघाली होती. यात ऊर्जानगर येथील अनेकांनी सहभाग घेतला होता. संमेलनासाठी उर्जानगरवासीय येथील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Context of National Convention on the Context

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.