ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण पूर्ववत सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:40+5:302021-06-11T04:19:40+5:30
फोटो बल्लारपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी नुकताच चंद्रपूर जिल्ह्याचा दाैरा केला. या दाैऱ्यादरम्यान ओबीसी समन्वय समिती, ...
फोटो
बल्लारपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी नुकताच चंद्रपूर जिल्ह्याचा दाैरा केला. या दाैऱ्यादरम्यान ओबीसी समन्वय समिती, बल्लारपूर व अन्नदाता एकता मंचच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर केले.
ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न करावे, २०१९ आणि २०२० वर्षात जाहीर केलेल्या ओल्या दुष्काळाची नुकसानभरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, चालू पीककर्ज खातेदारांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन म्हणून घोषित केलेली रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पीककर्ज पुनर्गठित केलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पाणंद रस्त्यांच्या खडीकरणाची कामे तातडीने मंजूर करावी, डिमांड भरल्यानंतर सात दिवसांत शेतक-यांना वीज कनेक्शन देण्यात यावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी ओबीसी समन्वय समिती, बल्लारपूर व अन्नदाता एकता मंच, भद्रावतीचे उमाकांत धांडे, विवेक खुटेमाटे, सुनील भटारकर, नंदकिशोर वाढई, संदीप खुटेमाटे, अनुप खुटेमाटे व पदाधिकारी उपस्थित होते.