कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:32+5:302021-05-03T04:22:32+5:30
बॉक्स खासगी कंपनीला कंत्राट शासनाने जिल्हा परिषद तसेच मनपा प्रशासनानतर्फे काही प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली. मात्र ...
बॉक्स
खासगी कंपनीला कंत्राट
शासनाने जिल्हा परिषद तसेच मनपा प्रशासनानतर्फे काही प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली. मात्र त्यानंतरसुद्धा कर्मचाऱ्यांची गरज भासत असल्याचे निर्देशनास येताच एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीतर्फे परिचारिका, सफाई कर्मचारी, चौकीदार, सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स देण्यात आला नाही. गरजेपोटी अनेकजण कार्य करीत आहेत. मात्र त्याना इन्शुरन्स नसल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
बॉक्स
शासकीय सेवेत सामावून घ्या
जिल्हा परिषद व मनपातर्फे बहुताश जणांची कंत्राटी भरती करण्यात आली. हे कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहे. मागील वर्षी कोरोनामध्ये अशाच कर्मचाऱ्यांची भरती करून रुग्णसंख्या घटल्यानंतर त्यांना कमी करण्यात आले. आता पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले. पुन्हा तशी वेळ येऊ नये, त्यामुळे शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
बॉक्स
बहुतांश झाले कोरोना बाधित
कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांनासुद्धा बाधा होण्याची शक्यता असते. जिल्ह्यात १८ कोविड केअर सेंटरमधील अनेक कर्मचारी बाधित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा इन्शुरन्स लागृ करणे गरजेचे आहे.
बॉक्स
कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कर्मचारीसुद्धा आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन अधिक असतानाही विमा कवच लागू केले आहे. याव्यतिरिक्त इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना अल्प वेतन दिले जाते. तसेच त्यांना विमा संरक्षणसुद्धा लागू नाही.
बॉक्स
राष्ट्रीय कर्तव्य म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहोत. परंतु, इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यल्प वेतन दिले जाते. तसेच कोणतेही विमा संरक्षण नसल्याने असुरक्षितता जाणवत असते.
-कंत्राटी कर्मचारी
-----
गरज असल्याने जीव धोक्यात घालून शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये काम करीत आहोत. रुग्णांशी दररोज संपर्क येत असल्याने कोरोना होण्याची भीती सतावत असते. विमा संरक्षण असते तर बरे झाले असते.
-कंत्राटी कर्मचारी
-----
आम्हीसुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा देत आहोत. मग त्यांच्यात आणि आम्हात भेद का? त्यांंना वेतनसुद्धा अधिक आणि आम्हाला वेतनपण कमी आणि विम्याचा लाभसुद्धा नाही.
--- कंत्राटी कर्मचारी