कंत्राटी कामगारांना अत्यल्प मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:34 PM2018-12-02T22:34:57+5:302018-12-02T22:35:14+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीकरिता नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या कामासाठी आठ महिन्यांपूर्वी निविदा प्रकाशित झाल्या होत्या. यानंतर ई निविदा पद्धतीने आलेल्या निविदा उघडण्यात आल्यानंतर तक्रार झाल्या. दरम्यान, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले. या परंतु प्रक्रियेची चौकशी झाली नाही, असा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीकरिता नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या कामासाठी आठ महिन्यांपूर्वी निविदा प्रकाशित झाल्या होत्या. यानंतर ई निविदा पद्धतीने आलेल्या निविदा उघडण्यात आल्यानंतर तक्रार झाल्या. दरम्यान, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले. या परंतु प्रक्रियेची चौकशी झाली नाही, असा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाने नियमानुसार दीड ते दोन महिन्यांमध्ये निविदा प्रक्रिया निकाली काढणे गरजेचे असताना मर्जीतील कंत्राटदाराला काम मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर निविदा प्रक्रिया थंडबस्त्यात टाकली. नवीन निविदेतील तरतुदीनुसार कामगारांना १३ ते १४ हजाराच्या जवळपास किमान वेतन व भत्ते यांच्यासह पगार मिळणे अवघड अपेक्षित होते. सहा महिन्यांपासून ४०० कामगारांना किमान वेतनाचा लाभ मिळाला असता. चौकशीचे पत्र निघून दोन महिन्यांचा कालावधी झाला. जुने कंत्राटदार यांना मुदतवाढ देण्याचे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले. मार्च २०१९ पर्यंत ही मुदतवाढ देण्यात येणार आहे. पण ही निविदा प्रक्रिया लांबल्यामुळे कामगारांना वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी किमान वेतनापासून वंचित राहावे लागणार आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आज कामगारांची बैठक घेतली. जर निविदा प्रक्रियेतील चौकशी करून प्रधान आरोग्य सचिवांनी न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.