कंत्राटी कामगारांचे वेतन प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:25 PM2018-04-04T23:25:08+5:302018-04-04T23:25:08+5:30
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचे मागील सहा महिन्यांचे प्रलंबीत वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनिता गायकवाड यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधिष्ठाता मोरे यांना बुधवारी देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचे मागील सहा महिन्यांचे प्रलंबीत वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनिता गायकवाड यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधिष्ठाता मोरे यांना बुधवारी देण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध पदावर कंत्राटी ४५० च्या जवळपास कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे कंत्राटदारांकडून किमान वेतन देणे गरजेचे असताना सहा हजार रूपये वेतन देत आहे. ते वेतनसुद्धा मागील सहा महिन्यांपासून थकीत आहे. परिणामी या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच कामगारांचा भविष्य निर्वाह निधी मागील अनेक महिन्यांपासून कंत्राटदाराने भरला नाही. त्यामुळे कामगारांचे प्रलंबीत वेतन त्वरीत द्यावे, तसेच भविष्य निर्वाह निधी भरण्यात यावा, या मागणीचे निवेदन वैद्यकीय अधिष्ठातांना देण्यात आले.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्ष विमल लांडगे, विभाग अध्यक्ष शकुंतला रंगारी, शहर उपाध्यक्ष ज्योत्सना सावरकर, उपाध्यक्ष अर्चना वासनिक, जया ब्राह्मणे, श्वेता मेश्राम, माधुरी वाढई आदी उपस्थित होते.