नगर परिषदेची ५० वर्ष जुनी झाडे ठेकेदाराने कापून परस्पर विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:10+5:302021-03-08T04:27:10+5:30
वरोरा नगरपालिकेने स्मशानभूमीच्या साफसफाई व देखभाल दुरुस्तीचे कंत्राट विलास दारापूरकर यांना दिले आहे. या स्मशानभूमीत सावली व विसाव्यासाठी ...
वरोरा नगरपालिकेने स्मशानभूमीच्या साफसफाई व देखभाल दुरुस्तीचे कंत्राट विलास दारापूरकर यांना दिले आहे. या स्मशानभूमीत सावली व विसाव्यासाठी लावलेली ५० वर्षांपूर्वीची जवळपास दहा जुनी मोठी झाडे तोडून, मेटॅडोरमधे टाकून कंत्राटदाराने परस्पर विकून टाकली. या स्मशानभूमीतील मोठ्या २५ लोखंडी ग्रील चोरट्यांनी यापूर्वीच लंपास केल्या होत्या. आता दिवसाढवळ्या मोठ्या मोठ्या लाकडाची सर्रास चोरी केल्या जात असून, नगर परिषद गप्प बसून आहे, असा आरोप नगर परिषदेची विरोधी पक्षनेते गजानन मेश्राम यांनी केला आहे. मेश्राम यांनी याबाबत लेखी तक्रार करूनही नगरपालिकेने पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल केली नाही. या गंभीर विषयावर वरोरा नगर परिषदने संबंधित कंत्राटदारावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे मेश्राम यांनी सांगीतले.
कोट
संबंधित कंत्राटदाराला यासंबंधी स्पष्टीकरण मागण्यात आले. उत्तर समाधानकारक आले नाही. त्यामुळे या यासंदर्भात आठ दिवसांत कार्यवाही करणार आहे.
- सूर्यकांत पिदुरकर मुख्याधिकारी न. प. वरोरा.