२१ बंधाऱ्यांच्या बांधकामाचे करारनामे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:30+5:302020-12-26T04:23:30+5:30

चंद्रपूर : जे कंत्राटदार विहित मुदतीत बंधाºयाचे काम पूर्ण करीत नाही, अशा कंत्राटदाराबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी ...

Contracts for construction of 21 dams canceled | २१ बंधाऱ्यांच्या बांधकामाचे करारनामे रद्द

२१ बंधाऱ्यांच्या बांधकामाचे करारनामे रद्द

Next

चंद्रपूर : जे कंत्राटदार विहित मुदतीत बंधाºयाचे काम पूर्ण करीत नाही, अशा कंत्राटदाराबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा.) यांनी अशा कंत्राटदाराकडील एकूण २१ बंधाºयाच्या बांधकामाचे करारनामे मागील दोन महिन्यात रद्द केलेले असून सुरक्षा ठेव व अनामत रक्कम शासनखाती जमा करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे विभाग, चंद्रपूर येथील सिमेंट प्लग बंधारे, को.प. बंधारे बांधकाम व दुरुस्तीचे कामे मोठया प्रमाणात घेण्यात आले होते. बांधकामाचे कंत्राट घेण्याकरिता कंत्राटदार, मजुर सहकारी सेवा संस्था, तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी बांधकामाचे कंत्राट मोठ्या प्रमाणात मिळविलेले असून करारनामेसुद्धा करण्यात आले होते. परंतु सदर बांधकामे विहित मुदतीत सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाचा निधी खर्च होत नाही व बंधाºयाचे बांधकाम पूर्ण होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांना सिंचनाच्या सोयीपासुन वंचित राहावे लागत आहे. शासनाचा शेतकºयांप्रति असलेला उद्देश सफल होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी नाराजी व्यक्त केली होती.

बॉक्स

दोन वर्षे कामे घेता येणार नाही

करारनामे रद्द करण्यात आलेल्या कंत्राटदाराला यापुढे दोन वर्षाकरिता कामे घेता येणार नाही व भविष्यात अशा प्रकारच्या पुनरावृत्ती झाल्यास कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच जी कामे अद्यापही सुरु करण्यात आलेली नाहीत, अशा कंत्राटदारांना नोटीस तामील करण्यात आली असून मार्च २०२१ अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे कंत्राटदार दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करणार नाहीत अशा कंत्राटदारांचे करारनामे रद्द करण्याबाबतची कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, (ल.पा.) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी कळविलेले आहे.

Web Title: Contracts for construction of 21 dams canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.