प्रकल्पग्रस्तांचे होणार करारनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:15 PM2018-11-17T22:15:21+5:302018-11-17T22:15:40+5:30
धोपटाला युजी टू ओसी आणि चिंचोली (बु) येथील वेकोलि प्रकल्पग्रस्त बल्लारपूर वेकोलिच्या निषेधार्थ १३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. पाच दिवस ॅ होऊनही वेकोलिकडून कोणतेच पाऊल उचलले नाही. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्या निर्देशानुसार प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी करारनामे करण्याचे मान्य केले. त्यामुळे शनिवारी उपोषणाची सांगता झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धोपटाला युजी टू ओसी आणि चिंचोली (बु) येथील वेकोलि प्रकल्पग्रस्त बल्लारपूर वेकोलिच्या निषेधार्थ १३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. पाच दिवस ॅ होऊनही वेकोलिकडून कोणतेच पाऊल उचलले नाही. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्या निर्देशानुसार प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी करारनामे करण्याचे मान्य केले. त्यामुळे शनिवारी उपोषणाची सांगता झाली.
प्रकल्पग्रस्तांना वेकोलि मुख्यालय नागपूर येथे सीएमडी समक्ष बैठकीसाठी बोलविण्यात आले. सुमारे दोन तास प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सदर प्रकल्पाचा अहवाल नव्याने तयार करून जानेवारी २०१९ च्या अखेरीस बोर्ड आॅफ डायरेक्टर (कोल) च्या प्रस्तावाला मान्यता करून घेऊन फेब्रुवारीमध्ये प्रकल्पग्रस्तांचे करारनामे सुरू करू, असे आश्वासन दिले. प्रकल्पग्रस्तांनी आश्वासनावर विश्वास ठेवून शेवटची संधी म्हणून शनिवारी दुपारी १२ वाजता उपोषणाची सांगता केली. मात्र, आश्वासनाचे पालन केले नाही तर पुन्हा उपोषण करण्याचा इशाराही प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी दिला. वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे नियोजन अधिकारी जी. पुल्लया, एपीएम रमेश सिंग यांच्या हस्ते मनोहर पटाले, विठोबा झाडे, सागर आर्इंचवार, दिलीप बुटले, केशव झाडे आदींना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
आंदोलनात प्रकल्पग्रस्तांना वेकोलिने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त यापुढे प्रकल्पग्रस्तांची मानसिकता बघता कोणतेही पाऊल उचलण्यासाठी मागे पाहणार नाही. हा अधिक तीव्र आंदोलन करून न्यायाकरिता संघर्ष करण्यास तत्पर असल्याचे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे नेतृत्व करणारे विजय चन्ने यांनी सांगितले. यावेळी सतीश बानकर, शरद चाफले, बालाजी कुबडे, विनोद बनकर, राजू मोहारे, प्रवीण मेकर्तीवार, अरुण सोमलकर, संतोष चौधरी, बालेश पुप्पलवार, संजू काळे, उमेश वाढई व अन्य शेतकरी उपस्थित होते.