देशभक्तांचे योगदान, आणीबाणीचा काळा इतिहास, योगाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:23+5:302021-06-18T04:20:23+5:30
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभर २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन, २३ जून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ...
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभर २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन, २३ जून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतीदिन, २५ जून रोजी आणीबाणी विरोधी काळा दिवस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७८ व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे सार्वजनिक प्रसारण हे चार महत्त्वाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. हे चारही कार्यक्रम या देशाच्या अस्मितेशी, इतिहासाशी संबंधित आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात तसेच महानगरात हे कार्यक्रम यशस्वीतेने राबवावे, असे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व महानगर शाखेची ऑनलाइन बैठक पार पडली.
या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. ५ हजार वर्षांची परंपरा योगाला आहे. श्रीमद भगवद गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने योगाचे महत्त्व विषद केले. संयुक्त राष्ट्रसंघात १७५ देशांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी हे चारही कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित होतील, याची यावेळी माहिती दिली. बैठकीला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. कीर्तीकुमार भांगडीया, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी आमदार सुदर्शन निमकर, अतुल देशकर, ॲड. संजय धोटे, जैनुद्दीन जव्हेरी, बल्लारपूरचे नगराध्यक्ष, हरिश शर्मा, भाजपाचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, भाजपा नेते प्रमोद कडू, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा सदस्य अंजली घोटेकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अल्का आत्राम, जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे, नामदेव डाहुले, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजयुमो ग्रामीण अध्यक्ष आशिष देवतळे, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, राजेंद्र खांडेकर आदींची उपस्थिती होती.