कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम दान आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:55 PM2018-07-23T22:55:55+5:302018-07-23T22:56:13+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांनी सोमवारी एक तास आधिक काम करून आंदोलन केले. विना वेतन एक तास अधिक केलेल्या कामाचे शासनाला प्रतिकात्मक दान करण्यात करून विविध मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांनी सोमवारी एक तास आधिक काम करून आंदोलन केले. विना वेतन एक तास अधिक केलेल्या कामाचे शासनाला प्रतिकात्मक दान करण्यात करून विविध मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
प्रहारचे जिल्हाप्रमुख नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकीत आहे. सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार शासन प्रत्येक महिन्याला नियमित देते. मात्र अत्यल्प पगारावर काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे पगार थकीत ठेवण्यात येत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. चार-सहा महिने कंत्राटदारांची बिले अडवून धरल्याने कंत्राटदारही हतबल आहे.
कामगारांचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, दर महिन्याला नियमित व नियमानुसार वेतन देण्यात यावे, नियमानुसार भत्ते व सुट्या देण्यात याव्यात, कंत्राटी कर्मचारी कामगार यांच्याशी अपमानजनक भाषेत बोलणाºया अधिकाºयांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, चुकीचे आरोप लावून कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्याचा प्रकार बंद करण्यात यावा इत्यादी मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले.
मागण्यांची दखल न घेतल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख पप्पू देशमुख यांनी दिला आहे. यावेळी प्रहार कामगार संघटनेचे सतीश खोब्रागडे, राहुल दडमल, कांचन चिंचेकर, सतीश येसांबरे, अमोल घोनमोडे, सतीश घोनमोडे, सागर हजारे, कल्पना ताडाम, ज्योती ढोलने, छाया कोखारे, माया वांढरे, आदींचा सहभाग होता.