सरकारी गुरुजींपेक्षा अल्पवेतन घेणाऱ्या कॉन्व्हेंटचे शिक्षक सरस
By admin | Published: July 24, 2016 01:11 AM2016-07-24T01:11:51+5:302016-07-24T01:11:51+5:30
शिक्षण हे वाघिनीचे दूध असून ते प्राशन केल्याने गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले जाते.
जिल्ह्याची स्थिती : शिक्षण क्षेत्रातील वास्तव
चिंधीचक : शिक्षण हे वाघिनीचे दूध असून ते प्राशन केल्याने गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले जाते. शिक्षण सर्वांगिण विकासाचे साधन आहे. शिक्षणामुळे मनुष्याच्या जीवनाला दिशा प्राप्त होतो. परंतु सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. अल्प पगारात काम करणारे कॉन्व्हेंटचे शिक्षक चांगले शिक्षण देत आहेत.
शिक्षणाच्या साहाय्याने मनुष्याच्या हातून कल्याणकारी कामे होऊ शकतात आणि त्याच कारणामुळे जगातील अनेक देश संरक्षण क्षेत्रानंतर शिक्षण क्षेत्रावर अर्थसंकल्पातील मधील अधिकची निधीची तरतूद करीत असतात. शासन ग्रामीण भागातील व दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, विद्यार्थी चांगला घडावा म्हणून शासन शिक्षकांच्या वेतनावर लाखो रुपये खर्च करीत आहे. जिल्हा परिषद, अनुदानीत शाळा, महानगरपालिका, नगरपालिका शाळेत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याची जाणीव सरकारी शिक्षकांना नाही. स्पर्धेच्या युगात मुलांचा टिकाव लागावा, त्यांच्यामध्ये गुणवत्ता टिकून राहावी, या कारणासाठी हा खर्च केल्या जातो. ४० हजार रुपये वेतन घेणाऱ्य सरकारी गुरुजीकडून शिकलेला शिष्य घडलेला दिसत नाही. त्यांच्याकडे अद्यायावत ज्ञानाचा अभाव दिसतो. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा टिकाव लागताना दिसत नाही. त्यामानाने अल्पवेतन होणाऱ्या कान्व्हेंटच्या शिक्षकांकडून शिकेलला विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. त्यांचा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये टिकाव लागत आहे. महिनोकाठी गलेलठ्ठ पगार घेणारे सरकारी गुरुजी शिक्षण देण्यात उदासिन का, हा एक मोठा संशोधनाचा विषय ठरू शकतो. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील लोकांनीसुद्धा सरकारी शाळेकडे पाठ फिरवून कान्व्हेंटच्या वाटेवरून जात आहेत. त्यामुळे या शाळांना सुगीचे दिवस येत आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणण्यासाठी या गुरुजीचा किती सिंहाचा वाटा आहे, हे दिसून येत आहे. (वार्ताहर)