ग्रामसंवादातून गावकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:07 PM2019-01-21T23:07:12+5:302019-01-21T23:07:32+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात सुरू आहेत. या अभियानातंर्गत विविध विभागातील अधिकारी गावाला भेट देत असून ग्रामसंवादातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात सुरू आहेत. या अभियानातंर्गत विविध विभागातील अधिकारी गावाला भेट देत असून ग्रामसंवादातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करीत आहेत.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गम भागातील गावांना वेगळी कलाटणी देऊन आदर्श गाव करण्याकडे वाटचाल सुरुआहे. या उपक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी विविध विभागातील अधिकारी ग्रामीण भागात भेट देऊन ग्रामसंवादाच्या माध्यमातून गावकºयांशी संवाद साधत असून त्यांचा समस्या जाणून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याने समस्या सुटण्यात मदत होत आहे.
या गावात साधला निवासी संवाद
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे जिल्हाधिकारी यांचा अध्यादेशाने सर्व तालुका स्तरांवरील अधिकारी अभियानातील गावामध्ये निवासी राहुन ग्रामसवांद हा कार्यक्रम घेत आहेत. गावातील नागरिकांचा समस्या जाणून घेऊन त्यां समस्याचे निरासरण करीत आहेत. तसेच आपल्या विभागातील योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करीत आहेत. आजपर्यंत जिवती तालुक्यातील माराई पाटण, पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ, नागभीड तालुक्यातील पेंडरी बरड, चंद्रपूर तालुक्यातील मोहुर्ली, चिमूर तालुक्यातील कवडशी देश, कोरपना तालुक्यातील जेवरा, मूल तालुक्यातील कोसंबी अशा १७ गावांमध्ये नुकतीच अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामवासीयांशी सवांद साधला आहे.
सात तालुक्यात सुरु आहे अभियान
जिल्ह्यातील जिवती, कोरपणा, मूल, पोंभूर्णा, चंद्रपूर, चिमूर, नागभीड या सात तालुक्यातील तब्बल ४२ ग्रामपंचायतींमध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्य सुरू असून मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक यांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राम परिवर्तकाच्या माध्यमातून जनजागृती करुन लोकांच्या मानसिकतेत बदल करून त्यांची विचारधारा विकासात्मक दृष्टीने घडविण्याचे कार्य करीत आहे. तसेच स्वच्छता, आरोग्य, सांडपाणी, महिला बचत गट, सक्षमीकरण, स्वयंरोजगार, शिक्षण, युवकांना मार्गदर्शन, सरकारी योजनांविषयी मार्गदर्शन, जलसंधारण आदी बाबींवर विशेष लक्ष देत आहेत.