२२ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे रुपांतरण

By admin | Published: September 13, 2016 12:38 AM2016-09-13T00:38:04+5:302016-09-13T00:38:04+5:30

गेल्या काही वषार्तील सततची नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकरी अहवालदिल झाला आहे.

The conversion of crop loan to 22 thousand farmers | २२ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे रुपांतरण

२२ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे रुपांतरण

Next

रूपांतरित शेतकऱ्यांना
३८ कोटींचे कर्ज वाटप
१ लाख १० हजार शेतकऱ्यांना ६७० कोटींचे कर्ज

चंद्रपूर : गेल्या काही वषार्तील सततची नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकरी अहवालदिल झाला आहे. यामुळे पिक कर्जाची परतफेडही शेतक-यांना त्रासदायक आहे. अशा स्थितीत त्यांना आधार देण्यासाठी शासनाने पिककजार्चे रुपांतरण करुन नव्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याची सुविधा दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात २२ हजार शेतक-यांच्या मागील थकीत पिककजार्चे रुपांतरण करुन या शेतक-यांना ३८ कोटी रुपये नव्याने पिककर्ज म्हणून उपलब्ध करुन दिले आहे.
गेल्या दोन तिन वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आणि दुष्काळासारखी स्थिती निर्माण होत आहे. त्याचा शेतक-यांच्या उत्पान्नावर परिणाम झाला आहे. पिक परिस्थीती चांगली नसल्याने शेतकरीही अहवालदिल आहे. अशा स्थितीत बँकेकडून घेतलेले पिककर्ज परतफेडीचाही अनेक शेतक-यांचा प्रश्न आहे. जुन्या कजार्ची परतफेड न केल्यास बँका नव्याने पिककर्ज देत नाही. अशा स्थितीत शेतकरी पिककजार्पासून वंचित राहू नये म्हणून शासनाने शेतक-यांच्या पिककर्जाच्या रुपांतरणाचा निर्णय घेतला होता.
ज्या शेतक-यांचे मागील वषीर्चे पिककर्ज थकीत आहे अशा शेतक-यांच्या कजार्चे रुपांतरण करुन त्यांना नव्याने पिककर्ज दिल्या जात आहे. कजार्चे रुपांतरण करतांना थकीत कर्ज पुढील पाच वर्षात समान हप्त्यात भरण्याची सुविधाही आहे. विशेष म्हणजे पहिला हप्ता सुध्दा शेतक-यांना पुढील वर्षी भरावयाचा आहे. रुपांतरण योजने अंतर्गत २२ हजार शेतक-यांच्या पिककजार्चे रुपांतरण करण्यात आले आहे. रुपांतरणाची रक्कम ११७ कोटी इतकी आहे.
विविध बँकांच्या वतीने दरवर्षी शेतक-यांना खरीप हंगामासाठी मोठया प्रमाणात पिककर्ज उपलब्ध करुन दिल्या जात असते. यावर्षी जिल्हयातील शेतक-यांना ७१४ कोटी रुपयाच्या पिककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी ११ हजार शेतक-यांनी ६७० कोटीचे पिककर्ज उचललेले आहे. (प्रतिनिधी)

पीक कर्जाचे वाटप सुरू
रुपांतरण झालेल्या ११ हजार शेतक-यांने नव्याने पिककजार्ची उचल केली आहे. त्यात ३८ कोटीच्या पीककजार्चा समावेश आहे. सदर रुपांतरणाची प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका तसेच ग्रामीण बँकांनी राबविली असून आपल्या गेल्या वर्षीच्या थकीत शेतक-यांना रुपांतरीत करुन त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास प्रारंभ केला आहे. अद्यापही रुपांतरीत शेतकरी नव्याने पिककजार्ची उचल करु शकते.

Web Title: The conversion of crop loan to 22 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.