केविड केअर सेंटरचे डीसीएचसीमध्ये रुपांतर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:29 AM2021-04-22T04:29:03+5:302021-04-22T04:29:03+5:30
चंद्रपूर : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बेड उपलब्ध होणे कठीण झाले आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे तालुक्यातील कोविड ...
चंद्रपूर : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बेड उपलब्ध होणे कठीण झाले आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे तालुक्यातील कोविड केअर सेंटरचे डीसीएचसी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे दररोज १२०० ते १५०० चे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना ऑक्सिजन बेड व रेमडिसिवर इंजेक्शनसाठी धावपळ सुरू आहे. परंतु, जिल्ह्यात ऑक्सिजन बेड व रेमडिसिवर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. उपचारासाठी रुग्णांचे नातेवाईक बाहेरच्या जिल्ह्यांत तसेच आंध्रात उपचारासाठी नेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सीसीसी हॉस्पिटलचे रूपांतरण डीसीएचसी हॉस्पिटलमध्ये करावे, सॅनिटायजर, सर्जिकल मास्क, एन-९५ मास्क, सोडियम हायफोक्लोराईड, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जनजागृतीकरिता पॉम्प्लेट व बॅनर आदी साहित्य पुरवावे, अशी मागणी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यांकडे केली.