कोरपना परिसराला औद्योगिक विकासाची आस

By admin | Published: December 29, 2014 11:40 PM2014-12-29T23:40:38+5:302014-12-29T23:40:38+5:30

तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे.

The core of industrial development in the Korpana area | कोरपना परिसराला औद्योगिक विकासाची आस

कोरपना परिसराला औद्योगिक विकासाची आस

Next

कान्हळगाव (कोरपना) : तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे.
हा तालुका आदिवासीबहुल अतिदुर्गम, नक्षलग्रस्त मागासलेला म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील गडचांदूर-नांदा परिसर व्यतिरिक्त इतरत्र कुठेही मोठा उद्योग नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. बेरोजगारांचा भरणा वाढल्यामुळे हाती मिळेल ते काम नाईलाजास्तव त्यांना करावे लागत आहे. बेरोजगारीच्या समस्येमुळे तालुक्यातील अनेक गावांतील सुशिक्षित तरुण इतरत्र ठिकाणी काम शोधताना दिसत आहे. तालुक्यात असलेल्या उद्योगात स्थानिकांना ऐवजी परप्रांतीयांचाच जास्त भरणा केला जाते आहे. या कारणाने बेरोजगारीची समस्या अधिक जटील होत चालली आहे. कोरपना परिसर व तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास होण्यासाठी या भागात उद्योगांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. जेवरा-चोपन भागातील खनिज भागांना प्राधान्य देऊन तेथे उद्योगाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी आहे. औद्योगिक विकास केंद्राची (एमआयडीसी) या क्षेत्रात अद्यापही स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळेच या परिसराचा औद्योगिकदृष्ट्या विकास खुंटला आहे.
सध्यस्थितीत तालुक्याचा अर्धा भाग औद्योगिक व उर्वरित शेतीप्रधान आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर अवलंबून राहावे लागते आहे. गडचांदूर, नांदा, नारंडा भागात उद्योग स्तिरावले असल्याने येथील विकास जलदगतीने घडून येते आहे. मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना व परिसरातील कान्हळगाव, पारडी, जेवरा, परसोडा, कोठोडा, गोविंदपूर, कोडशी (बु.), दुर्गाडी, रुपापेठ, पांडुगुडा, मांगलहिरा, थिप्पा, उमलहिरा, चोपन चनई, मांडवा, सावलहिरा, खैरगाव, गांधीनगर, हातलोनी, कमलापूर, येरगव्हान, बोरगाव, धोपटाळा, हेटी, कातलाबोडी, तुळशी, पिपरी, माथा, कुसळ, पिपर्डा, वनसडी, महेंदी, आदी गावांकडे उद्योगच नसल्याने बेरोजगारीची समस्या आहे. यातील काही गावे, अतिदुर्गम व मागासलेली असल्याने या भागात विकासाचा सूर्य उगवला नाही.
या भागातील औद्योगिकदृष्ट्या विकास घडून आल्यास, हा तालुका नक्कीच सुजलाम्, सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद येथील जनतेकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The core of industrial development in the Korpana area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.