कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:40+5:302021-06-16T04:37:40+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र कोरोना अद्याप पूर्णत: गेला नाही. त्यामुळे या कालावधीत रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी ...

Corona after-home kitchen; Healthy foods increased! | कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले!

कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले!

googlenewsNext

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र कोरोना अद्याप पूर्णत: गेला नाही. त्यामुळे या कालावधीत रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सहजपणे उपलब्ध होणारा ताजा आणि सकस आहार कोरोनाच नव्हे तर कोणत्याही आजारांवर मात करण्यास उपयुक्त ठरू शकतो. उत्तम आहाराच्या जोरावरच प्रतिकारकशक्ती सुदृढ राहू शकते, ही जाणीव खऱ्या अर्थाने गृहिणींमध्येच रुजली आहे. कोरोनानंतर त्या अधिक सजग झाल्या एवढाच काय तो फरक. गृहिणी आता बाहेरचे अन्न (विशेषत: कच्चे अन्न, रस्त्याच्या कडेला असलेले खाद्य) आणि थंड पदार्थ टाळत आहेत. त्याऐवजी भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, गरम पेये (सूप, गरम पाणी, वरण, काढा घेण्यास कुटुंबाला प्रोत्साहन देत आहेत. तुळस, हळद, पुदीना, लवंगा यासारख्या घशाला आराम देणाऱ्या पदार्थांचा काढा पिण्याचे प्रमाणही आत घरोघरी वाढत असल्याची माहिती चंद्रपुरातील बालाजी वॉर्डातील सुगरण गृहिणी स्मिता चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

फास्ट फूडवर अघोषित बंदी

हजारो कुटुंंबांच्या घरातील व्यक्तींना कोरोना होऊन गेला. त्यामुळे यापुढचा आहार कसा असावा, याबाबत जागरूकता वाढली.

साखर, मीठ व मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांबाबत गृहिणी आता विचार करू लागल्या. फास्ट फूडऐवजी सकाळी च्यवनप्राश, आवळा शरबत, आवळा कँडी, किवी व अन्य एखादे फळ खाण्याला पसंती दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधासाठी गृहिणींचे व्हिटॅमिन सीकडे अधिक लक्ष गेले आहे.

रोजच्या जेवणात हे हवेच

पालेभाज्या व कडधान्यांचा वापर करावा. आहारात मसाले कमी वापरावेत. हळदीचे दूध प्यावे. हळद, दूध आणि पाण्याचे मिश्रण उकळून घेऊन हळद दूध करावे. कोरोनामुक्त झाल्यानंतर अशक्तपणा येण्याचा संभव असतो. त्यामुळे गिलके, दोडके, भोपळा, पडवळ अशा भाज्यांचा आहारात वापर करावा. मूग, उडीद व मसूर डाळीचा आहारात वापर केल्यास प्रकृती सुदृढ राहते. अंडी हा प्रोटिन्सचा उत्तम स्रोत आहे.

कच्च्या भाज्या, कडधान्य पोषणाचा खजिना

कोरोनामुळे अनेक कुटुंबे दररोजच्या आहारात कच्च्या भाज्या व कडधान्यांचा आवर्जून समावेश करू लागले. कडधान्ये पचायला सोपी असतात. जीवनसत्त्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. कडधान्ये मोड आणून चांगली शिजवली तर ट्रिप्सिन इनहिबीटरसारख्या घटकांचा नाश होतो. शिजविताना आमसूल व चिंच यासारखे आंबट पदार्थ टाकण्याकडे गृहिणींचा कल वाढला आहे. कच्च्या भाज्या वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे.

कोट

आहार चांगला असला तरच प्रकृती निरोगी राहू शकते. कोरोना संसर्गामुळे कुटुंबाची काळजी वाढली. तेव्हापासून आहारातही बदल करावे लागले. सकाळी मुले घेत असलेल्या दुधापासून तर जेवणापर्यंत सर्वांनी सतर्क राहावे. आरोग्याला पोषक पदार्थच तयार करावे.

- संघू खैरे, विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर

Web Title: Corona after-home kitchen; Healthy foods increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.