चंद्रपूर जिल्ह्यातही कोरोना वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:44 AM2021-02-23T04:44:42+5:302021-02-23T04:44:42+5:30
जिल्हा प्रशासनाने या अनुषंगाने हालचाली सुरू केलेल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर शहरात २ व इतर तालुक्यात १४ असे १६ ...
जिल्हा प्रशासनाने या अनुषंगाने हालचाली सुरू केलेल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर शहरात २ व इतर तालुक्यात १४ असे १६ कोरोना केअर सेंटर सुरू केले आहेत. यामध्ये एकूण १ हजार ६३५ खाटा उपलब्ध आहे. जिल्ह्यात दोन शासकीय डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर असून, येथे ११४ व खासगी सेंटरमध्ये १३ अशा २५८ खाटांची सुविधा आहे. यासोबतच चंद्रपूर शहरात शासकीय डेडीकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात २४० खाटा व ६ खासगी रुग्णालयात ९ अशा ३१३ खाटांची सुविधा उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी संध्या गुरनुले यांनी दिली.
कोविडचा सामना करण्यासाठी सद्यस्थितीत पुरेशा प्रमाणात प्रतिबंधात्मक व उपचारात्मक औषधी, साहित्य साठा उपलब्ध आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील तीन महिन्याकरिता हा साठा पुरेसा आहे, याकडेही जि.प. अध्यक्ष गुरनुले यांनी लक्ष वेधले. यावेळी उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजकुमार गहलोत, जि.प. सदस्य सजय गजपुरे उपस्थित होते.