बल्लारपुरात जेसीसची कोरोनाविषयक जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:21+5:302021-03-21T04:26:21+5:30
बल्लारपूर : शहराला लॉकडाऊनपासून वाचविण्यासाठी व नागरिकांत जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्था जेसीआय बल्लारपूर वूड सिटीच्या वतीने लॉकडाऊनपेक्षा मास्क लावणे ...
बल्लारपूर : शहराला लॉकडाऊनपासून वाचविण्यासाठी व नागरिकांत जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्था जेसीआय बल्लारपूर वूड सिटीच्या वतीने लॉकडाऊनपेक्षा मास्क लावणे चांगले हा नारा देत, शहरात जनजागृती रॅली काढून प्रत्येक नागरिकांना कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले.
जेसीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन दिवस शहरातील विविध चौकांतील दुकानात, ऑटोरिक्षांना, ट्रक चालकांना मास्क वितरण केले व दुकानात ‘नो मास्क नो एंट्री’चे पोस्टर, स्टिकर लावले. व्यापारी बांधवांना ग्राहकांना मास्क लावूनच दुकानात प्रवेश देण्याचे सांगण्यात आले. या मोहिमेत नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी जयवंत काटकर, वाहतूक पोलीस, नगरपरिषदचे कर्मचारी यांची उपस्थिती होती. जेसीआयचे अध्यक्ष सुनील जैन, प्रकल्प निर्देशक विकास राजूरकर, प्रकाश दोतपल्ली, अजय गुप्ता, अमित गिडवाणी यांनीही सहकार्य केले.