नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाला हरविणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:47+5:302021-05-04T04:11:47+5:30
सुभाष धोटे : राजुरा येथे लसीकरणास शुभारंभ राजुरा : समाज मंदिर, रामनगर कॉलनी, राजुरा येथे १८ ते ४४ वर्ष ...
सुभाष धोटे : राजुरा येथे लसीकरणास शुभारंभ
राजुरा : समाज मंदिर, रामनगर कॉलनी, राजुरा येथे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोविड-१९ लसीकरणाचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आ. धोटे म्हणाले, सध्या देशात, चंद्रपूर जिल्ह्य़ात तसेच राजुरा परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. अनेकांना आपले जीवन गमवावे लागले आहेत. अनेकांना नुकसान सहन करावे लागले आहे. ते कधीही भरून निघणारे नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी लाॅकडाऊनचे आणि शासकीय, प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करून आपल्या आणि आपल्या परिवारातील कुटुंबियांची काळजी घ्यावी. सोबतच शासनाने लसीकरण मोहीम अधिक व्यापक आणि गतिमान केली आहे. सर्वांनी लसीकरण करून, सर्व ती खबरदारी घ्यावी, म्हणजे कोरोनाला हरवणे सहज शक्य होईल.
याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू कुळमेथे, नायब तहसीलदार, परिचारिका, तथा नागरिक उपस्थित होते.