नियोजनबद्ध पद्धतीने कोरोनावर मात करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:25+5:302021-05-03T04:22:25+5:30

चंद्रपूर : कोरोनाचे हे संकट अधिक तीव्र आहे. त्यामुळे पुढचे नियोजन करताना ऑक्सिजन व मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही, याकडे ...

Corona can be overcome in a planned manner | नियोजनबद्ध पद्धतीने कोरोनावर मात करणे शक्य

नियोजनबद्ध पद्धतीने कोरोनावर मात करणे शक्य

Next

चंद्रपूर : कोरोनाचे हे संकट अधिक तीव्र आहे. त्यामुळे पुढचे नियोजन करताना ऑक्सिजन व मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी नागरिकांनी संचारबंदीचे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कोरोना आजाराच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मर्यादित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड प्रामुख्याने उपस्थित होते.

बाॅक्स

विविध उपाययोजनांची दिली माहिती

कोविडचे संकट संवेदनशीलतेने हाताळताना मोठ्या प्रमाणात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ११ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, १९ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, तर १८ कोविड केअर सेंटर कोविडचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत आहे. १४०० बेडचे नियोजन पूर्ण झालेले असून, त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात ५०० बेड्सचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यास मान्यता मिळाली आहे. रुग्णांना गावातच आयसोलेशन करता यावे याकरिता आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी तसेच रुग्णांच्या आरोग्य सोयी-सुविधेसाठी ८५० ग्रामपंचायतींना १ कोटी ८० लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. लवकरच महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वन अकादमी येथे १०० ऑक्सिजन बेड्स कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व विहित वेळेत काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केल्या.

बाॅक्स

पालकमंत्र्यांनी घेतले लसीचा पहिला डोस

पालकमंत्री वडेट्टीवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला. स्टाफ नर्स सावी मानकर यांनी लस दिली. तसेच नागरिकांनी लस घ्यावी, लस सुरक्षित व प्रभावी आहे. तसेच लस ही कोरोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोरे येऊन लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Corona can be overcome in a planned manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.