गोवरी येथील कोरोना स्थिती व तापाची साथ आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:27 AM2021-05-01T04:27:00+5:302021-05-01T04:27:00+5:30

गावातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून ग्रामपंचायत सरपंच आशा उरकुडे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी ...

Corona condition and fever in Gowri under control | गोवरी येथील कोरोना स्थिती व तापाची साथ आटोक्यात

गोवरी येथील कोरोना स्थिती व तापाची साथ आटोक्यात

Next

गावातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून ग्रामपंचायत सरपंच आशा उरकुडे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी यांनी आरोग्य विभागाला गावातील या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. त्यानंतर कढोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीनकुमार ओदेला यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाचा चमू गोवरी येथे दाखल झाला. त्यांनी तातडीने आरोग्य उपकेंद्रात नागरिकांची कोरोना अँटिजन चाचणी करण्यात आली. चार दिवस घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात जवळपास तब्बल ७० कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे आढळून आले. एकाच गावात एवढे मोठे रुग्ण कोरोनाबाधित निघाल्याने व गावात सहा जणांचा मृत्यू झाल्याने गोवरी गावात भीतीचे वातावरण पसरले होते. गावातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तहसीलदार हरीश गाडे यांनी गोवरी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. गावातील मुख्य रस्ते बंद केल्यामुळे बाहेरून कोणतीही व्यक्ती गावात येऊ नये याची खबरदारी घेण्यात आली. यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोग्य कर्मचारी सुरेश कुंभारे, गाडगे, ढोके, गावातील आशा वर्कर्स यांनी गावातील रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले.

Web Title: Corona condition and fever in Gowri under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.