कोरोना मृतकांच्या आकडेवारीचा मेळ जुळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:20 AM2021-04-29T04:20:57+5:302021-04-29T04:20:57+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधित, कोरोनामुक्त, मृतक व अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेकडून जाहीर केली जात आहे. मात्र, राज्य शासन ...

Corona death statistics do not match! | कोरोना मृतकांच्या आकडेवारीचा मेळ जुळेना!

कोरोना मृतकांच्या आकडेवारीचा मेळ जुळेना!

Next

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधित, कोरोनामुक्त, मृतक व अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेकडून जाहीर केली जात आहे. मात्र, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या माहितीत तफावत आढळली असून, मृतकांच्या आकडेवारीचाही मेळ जुळत नसल्याचे अहवालातून दिसून आले.

मार्च २०२१पासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसोबतच बाधित, कोरोनामुक्त, मृतक व सक्रिय रूग्णांची राज्य शासनाच्या आदेशानुसार विहीत सिस्टीमप्रमाणे माहिती संकलित करण्याची यंत्रणा कार्यरत आहे. जिल्हाभरातून प्राप्त झालेली माहिती आरोग्य यंत्रणेकडून जिल्हा माहिती कार्यालयाकडून माध्यमांकडे पाठवली जात आहे. मृतांची माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर संकेतस्थळावर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांकडून भरली जाते. ही माहिती व छाननीची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. त्यामुळे ही माहिती विशिष्ट दिवसानंतर तरी समान होणे अभिप्रेत आहे. मात्र, चंद्रपूर जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या माहितीत सतत तफावत आढळत आहे. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या महाआरोग्य संकेतस्थळावर दररोज जिल्हानिहाय माहिती जाहीर केली जाते. त्याशिवाय, कोरोनामुक्त रूग्णांची जिल्हानिहाय माहिती कोविड पोर्टलवर नोंदविण्यात येते. ही माहितीदेखील अपडेट करण्याची कार्यवाही सुरू असते. परंतु, राज्य शासन व चंद्रपूर जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या माहितीत तफावत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

मृतांच्या रूग्णसंख्येत २२६चा फरक

राज्य आरोग्य प्रशासनाने मंगळवार (दि. २७)च्या अहवालात ६०२ कोरोनाबाधित मृतकांची संख्या नोंदवली तर जिल्हा प्रशासनाच्या अहवालात मृतांची संख्या ८२८ आहे. राज्य व जिल्हा प्रशासनाच्या माहितीत २२६ मृतांची तफावत आढळली. चंद्रपूर महानगरपालिकेने बुधवारपर्यंत २७९ मृतांची नोंद केल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली. राज्य अहवालात चंद्रपूर ग्रामीण व मनपा क्षेत्रात २१७ अशा एकूण जिल्ह्यातील ६०२ मृतांची नोंद आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या मंगळवारच्या माहितीत एकूण मृतकांची संख्या ८२८ आहे. त्यामुळे या संख्येत २२६चा फरक दिसून आला.

अ‍ॅक्टिव्ह रूग्णांमध्ये ९ हजार ७८६ची तफावत

राज्य प्रशासनाच्या दैनंदिन बुलेटिन अहवालात मंगळवारी अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २५ हजार ३२० तर जिल्हा अहवालात १५ हजार ५३४ रूग्णांची नोंद आहे. या दोन्ही अहवालात अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्येत ९ हजार ७८६ची तफावत आढळते.

Web Title: Corona death statistics do not match!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.