कोरोनाने बिघडले गावातील आर्थिक चक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:10+5:302021-07-10T04:20:10+5:30

कोरोना संकटामुळे व्यवसाय-उद्योगधंदांना पाहिजे तशी गती नाही. मजुरांच्या हाताला काम उरले नाही. परिणामी, मजुरांची प्रचंड आर्थिक कोंडी होत आहेत. ...

Corona disrupted the village's economic cycle | कोरोनाने बिघडले गावातील आर्थिक चक्र

कोरोनाने बिघडले गावातील आर्थिक चक्र

Next

कोरोना संकटामुळे व्यवसाय-उद्योगधंदांना पाहिजे तशी गती नाही. मजुरांच्या हाताला काम उरले नाही. परिणामी, मजुरांची प्रचंड आर्थिक कोंडी होत आहेत. सध्या हंगामाचे दिवस असल्यामुळे काही जण शेतीत राबू लागले.

काही दशकांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी गावखेड्यात अवस्था होती. मात्र, लहरी निसर्ग, सरकारची शेतकरी विरोधी धोरण, मजुरांचे वाढते दर शेतमालाला खर्चाच्या तुलनेत कमी हमी भाव, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट आदी बाबींमुळे शेती व्यवसाय तोेट्यात येत आहेत. परिणामी, बेरोजगार युवक शहरात जाऊन नोकरी करू लागला. मात्र, कोरोना संकटामुळे सर्वांचे गणित बिघडले आहे.

अनेकांनी छोटा व्यवसाय सुरू केला आहे, तर काही जणांनी आईवडिलांना मदत म्हणून शेतात काम करणे सुरू केले आहे.

अनेक लहान-मोठ्या उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा शेतीतूनच होतो. यावरून आर्थिक विकासात शेतीचे महत्त्व लक्षात येते. मात्र, दिवसेंदिवस शेती करणेही कठीण होत आहे. रासायनिक खते, बियाण्यांचे भाव गगनाला पोहोचले आहे. त्यातच निसर्गही साथ देत नसल्यामुळे बेरोजगार युवक शेती करण्यापेक्षा दुसऱ्यांकडे नोकर राहण्याला पसंती देत आहेत.

Web Title: Corona disrupted the village's economic cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.