आतापर्यंत ऑरेंज झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 08:55 PM2020-05-02T20:55:05+5:302020-05-02T21:04:37+5:30
चंद्रपूर येथील कृष्णनगरातील 50 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील कृष्णनगरातील 50 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्ण कोरोना आयसोलेशन वॉर्ड मध्ये भरती असून प्रकृती स्थिर आहे. त्याला दमा व खोकल्याचा त्रास होता. तसेच न्युमोनियाचाही त्रास होत असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाकडे त्यांचा पूर्व इतिहास अद्याप नाही. त्याचा थ्रोट स्वॅब नागपूरला पाठवला होता. त्याचा शनिवारी निकाल पॉझिटिव्ह आला आहे.