मकरसंक्रातदिनी कोरोना विस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 05:00 AM2022-01-16T05:00:00+5:302022-01-16T05:00:39+5:30
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९० हजार ४५९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ५८० झाली आहे. सध्या १,३३४ ॲक्टिव्ह बाधितांवर उपचार सुरू आहेत. ८ लाख १९ हजार ४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ लाख २७ हजार ११४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १,५४५ बाधितांचे मृत्यू झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सलग दोन आठवड्यांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच मकरसंक्रातीदिनी तब्बल ३४१ पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे चंद्रपुरात दिवसभरात २१२ जणांना कोरोनाची लागण झाल्याने स्थिती विस्फोटाच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना बाधितांच्या वाढीने ॲक्टिव्ह रुग्णांचा आलेखही दररोज चिंताजनक होत आहे. गत २४ तासात ९१ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात २१२, चंद्रपूर ३३, बल्लारपूर २१, भद्रावती ५, ब्रह्मपुरी ३, नागभीड ३, सिंदेवाही २, मूल २०, सावली १, राजुरा २४, वरोरा २, तर कोरपना येथे १५ रुग्ण आढळून आले. कोरोना संपला या मानसिकतेतून बाहेर यावे त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या बाराशेच्या पार
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९० हजार ४५९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ५८० झाली आहे. सध्या १,३३४ ॲक्टिव्ह बाधितांवर उपचार सुरू आहेत. ८ लाख १९ हजार ४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ लाख २७ हजार ११४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १,५४५ बाधितांचे मृत्यू झाले आहेत.
पाॅझिटिव्हचा वेग कायम राहिल्यास धोका
शुक्रवारी जिल्ह्याचे पालक सचिव अनुपकुमार यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या यंत्रणेवर ताण नाही. परंतु समोरचा एक ते दीड महिना अत्यंत महत्त्वाचा आहे, असा इशाराही त्यांनी दिला. या आठवड्यातील पॉझिटिव्ह दर कायम राहिल्यास धोका वाढू शकतो.
बरे होण्याचे प्रमाणही ९८ टक्के
गृहविलगीकरणातील ८६९ ॲक्टिव्ह रुग्णांपैकी ८२० जणांना अतिशय सौम्य लक्षणे असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला.
जिल्ह्यात ३१ जण सीसीसी आणि १८ जण डीसीएचमध्ये दाखल आहेत. बरे होण्याचे प्रमाणही ९८ टक्के आहे. हाच एक दिलासा आहे. विशेष म्हणजे गृहविलगीकरणात राहून उपचार करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती पुढे आली.
अशी आहे जिल्हा प्रशासनाची तयारी
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ९० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करून ठेवण्याचे नियोजन केले आहे. १५ लाख ३७ हजार ३१४ जणांनी पहिला डोस घेतला. त्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १० लाख ७९ हजार ३५६ (६५.७४. टक्के) आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. बाधितांची संख्या २५ हजार ३३२ झाली तरी सुविधा अपुऱ्या पडणार नाही, असे नियोजन प्रशासनाने केले आहे