जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 05:00 AM2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:01:24+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्यास्थितीत ४६७ वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास रुग्णसंख्या १२७ वर पोहचली आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, मूल बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्याचा नंबर आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात सध्या शेतीकामे सुरु आहे. त्यामुळे कधी रुग्ण सापडेल आणि लॉकडाऊन होतील, याचा सध्यातरी नेम नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोनाने आपला विळखा अधिक घट्ट केला आहे. प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी कोरोनाचे पाय आता ग्रामीण भागातही घट्ट होऊ लागले आहे. वाढती रुग्णसंख्या सध्या जिल्हा प्रशासनासह, नागरिकांचा थरकाप उडविणारी ठरत आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्यास्थितीत ४६७ वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास रुग्णसंख्या १२७ वर पोहचली आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, मूल बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्याचा नंबर आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात सध्या शेतीकामे सुरु आहे. त्यामुळे कधी रुग्ण सापडेल आणि लॉकडाऊन होतील, याचा सध्यातरी नेम नाही. दोन महिन्यापूर्वी दिवसाआड एक दोन रुग्ण आठळणाºया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता दिवसाचा २० च्या संख्येने रुग्ण संख्या वाढत आहे. हा आकडा दर दिवशी वाढत आहे. ग्रामीण भागात वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक केंद्रामध्ये स्वॅब चाचणी सुरू करण्यात आली आहे. ताडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीमध्ये ही चाचणी सुरु करण्यात आली असून ३० हजारावर नागरिकांची तपासणी करण्याचे लक्ष ठरविण्यात आले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकसंख्येमध्ये आतापर्यंत ५ प्रतिबंधित क्षेत्र जारी करण्यात आले आहे. या भागात आत्तापर्यंत १८ कोरोना बाधित पुढे आले आहे. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २७ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहे. दरम्यान, चंद्रपूर येथेही अॅन्टिजेन केंद्र सुरु करण्यात आले आहे. जटपुरा वार्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सुरु केलेले आहे. चाचणी करण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध आहे. अॅन्टिजेन चाचणी केंद्रामध्ये दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोना चाचण्याचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी केवळ १५ ते ३० मिनिटाचा आहे. दरम्यान, गडचांदूर येथेही अॅन्टिजेन चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे.
नागभीड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नगर परिषदेने जनता कर्फ्यूचे लावला आहे. नागभीड येथील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाºया पती-पत्नीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. या दोघांच्या संपर्कात कोण आणि किती जण आले. याचा शोध आरोग्य विभागातर्फे घेणे सुरु केले आहे. त्यानंतर आणखी चार व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने नागभीड येथे खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजीपाला व्यावसायिक हा नागपूरवरून भाजीपाला खरेदी करून आणायचा आणि पत्नी हातगाडीवर नागभीड शहरात भाजीपाला विक्री करायची. या तीन-चार दिवसात तिने नागभीडमधील संपूर्ण जुन्या वस्तीत भाजीपाला विक्री केल्याचे बोलल्या जात आहे. औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.
मूल आणि राजुरा येथे गुन्हा दाखल
एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तर दुसरीकडे काही नागरिक नियम पाळायला तयार नाही. त्यामुळे प्रशासनालाही कठोर व्हावे लागत आहे. दरम्यान, मूल आणि राजुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा शहरातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या एकाने मद्य प्राशन करून गोंधळ घातला. त्यामुळे त्यामुळे त्याच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तर मूल येथील राईसमील मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे बिहार राज्यातून आलेल्या आलेल्या मजुरांना गृहविलगीकरणात ठेवण्याचे आदेश असतानाही साईकृपा राईसमिल व ओमसाईराम राईसमीलच्या संचालकांना नियम न पाळल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.