बेफिकीर तरुणांमुळेच ज्येष्ठ व मुलांमध्ये वाढतोय कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:25 AM2021-04-14T04:25:42+5:302021-04-14T04:25:42+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. शनिवारी व रविवारी वीकेंड ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला. मात्र, आजचे युवा बेफिकीरीने वागत असल्याचे दिसून येत आहे. कोणतेही काम नसताना विनाकारण घराबाहेर पडणे, मास्क न घालणे, घोळका करून मित्रांमध्ये बिनधास्त वावरणे आदी प्रकारांमुळे हे तरुण स्वत:ही बाधीत होत आहे. त्याचाच फटका कधीही घराबाहेर पाऊल न टाकणाऱ्या ज्येष्ठांना व बालकांना होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यामुळे स्वत:चे कुटुंबच अडचणीत आणण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामानिमित्तच घराबाहेर पडावे विनावश्यक घराबाहेर पडू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
बॉक्स
बाहेरून घरी आल्यानंतर ही घ्या काळजी
घरात जाण्यापूर्वी स्नान करावे, शक्यतो सर्व कपडे त्याच दिवशी भिजवून धुण्यासाठी धावेत, मोबाईल, बेल्ट,पॉकेट, सॅनिटाईज करून घ्यावे.
घरामध्ये वावरत असताना शक्यतो मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपासून काही अंतर ठेवूनच संवाद साधावा, घरीदेखील मास्क वापरावे.
बाहेरून घरी आल्यानंतर गरम पाण्याची वाफ घ्यावी,
बॉक्स
चंद्रपूर शहरातील एका कुटुंबातील एक मुलगा कोरोनाबाधित झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील आई-वडील देखील काही दिवसांनी बाधित झाले. विशेष म्हणजे ते ज्येष्ठ व सेवानिवृत्त असल्याने घराबाहेर पडतच नव्हते तरीही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा प्रकार घडला आहे. असे अनेक रुग्ण शहरात आहेत.
----
जिल्ह्यातील ० ते पाच वयोगटांतील ५१३ बालके कोरोनाबाधित झाली आहेत. शाळा बंद असल्याने ही मुले घराबाहेर पडतच नाही तरीसुद्धा ही मुले बाधित झाली. घरातील व्यक्तींमुळेच ही बाधीत झाली असल्याचा संशय आहे. त्यामुळे बेफिकीरीपणे वागणे सोडले पाहिजे, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
कोट
कोरोनाची लक्षणे दिसताच लहान मुलांपासून किंवा ज्येष्ठांपासून दूर राहावे, स्वत:ला विलगीकरण करून घ्यावे. लहान मुले बहुतांश मास्क वापरत नाही. त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी बाहेर जावू देऊ नये.
डॉ. अविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी, मनपा
बॉक्स
१८ वर्षांखालील पॉझिटिव्ह ३३८४
६१ वर्षापेक्षा अधिकचे पॉझिटिव्ह ४०३६
एकूण पॉझिटिव्ह ३४५०३