कोरोनाने आतापर्यंत रोखला ४०१ जणांचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:07+5:302021-03-13T04:51:07+5:30
मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन झाल्यानंतर जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होती. मात्र मध्यंतरी यामध्ये झपाट्याने वाढ झाली. एवढेच नाही तर मत्यूसंख्याही ...
मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन झाल्यानंतर जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होती. मात्र मध्यंतरी यामध्ये झपाट्याने वाढ झाली. एवढेच नाही तर मत्यूसंख्याही वाढली. दिवाळीनंतर हा आकडा कमी झाला. आता पुन्हा कोरोनाने तोंडवर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ३६३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
गुरुवारी बाधित आलेल्या ९६ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २९, चंद्रपूर तालुका ११, बल्लारपूर एक, भद्रावती चार, ब्रम्हपुरी १८, नागभीड दोन, मूल एक, सावली एक राजूरा पाच, वरोरा २३ व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ४८१ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ३०७ झाली आहे. सध्या ७७३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख २७ हजार ३०२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ७७६ नमुने निगेटीव्ह आले आहेत.
बाॅक्स
असे आहे मृत्यू
चंद्रपूर ३६३
तेलंगणा ०१
बुलडाणा ०१
गडचिरोली १८
यवतमाळ १६
भंडारा ०१
वर्धा ०१
बाॅक्स
२४ तासाच ९६ रुग्ण
बाॅक्स
लसीकरणापासून अनेकजण राहणार वंचित
शासनाच्या आदेशानुसार आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करूनच कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. परंतु जिल्ह्यात बहुतांश नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने या नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागणार आहे. विशेषत: रस्त्यावर भिक मागून खाणारे अनेक घटकांतील नागरिकही वंचित राहू शकतात.
जिल्ह्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सुविधा कर्मचारी तर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील सर्व नागरिकांना आणि अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येत आहेत. या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी काही खासगी रुग्णालयांमध्ये आधारकार्ड घेऊन गेल्यानंतर तिथेही ऑनलाईन नोंदणी करून दिली जात आहे. मात्र आधार कार्ड अत्यावश्यक आहे.
बाक्स
आधार नोंदणीची अट शिथिलकरून सर्वांना लस द्यावी, अशी मागणी सामाजिक संस्थाकडून केली जात आहे. शासनाला कोरोना हद्दपार करायचा असेल तर भंशक टक्के नागरिकांना लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. पण आधार कार्ड किंवा अन्य नोंदणीच्या अटी शिथिल करणे गरजेचे आहे.
बाॅक्स
चंद्रपूर, वरोरा आघाडीवर
मागील काही दिवसांपासून वरोरा तसेच चंद्रपूर शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मागील २४ तासामध्येही याच तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक आढळून आली आहे. यामध्ये चंद्रपूर पालिकाक्षेत्र २९ तर वरोरामध्ये २३ रुग्ण आढळले आहे.