घर बांधकामाला कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:24 AM2021-04-05T04:24:44+5:302021-04-05T04:24:44+5:30
‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ या म्हणीप्रमाणे दिवसेंदिवस घर बांधणे सामान्य नागरिकांना अवघड होत आहे. कोरोना लाॅकडाऊननंतर ...
‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ या म्हणीप्रमाणे दिवसेंदिवस घर बांधणे सामान्य नागरिकांना अवघड होत आहे. कोरोना लाॅकडाऊननंतर तर बांधकाम साहित्याचे दर गगणाला भिडले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे घर बांधण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्न ठरत आहे. सामान्यत: दिवाळीनंतर घर बांधकाम करण्याचा नागरिकांचा कल असतो. मात्र मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र ठप्प झाले. आता अर्धवट असलेले बांधकाम पूर्ण केल्या जात आहे. त्यातच लाॅकडाऊनमध्ये बहुतांश कंपन्या बंद असल्यामुळे आणि मागणीच्या तुलनेत साहित्याची आवक घटल्यामुळे बांधकाम साहित्याचे दर वाढले आहे. त्यातच अद्यापही बहुतांश वाळूघाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे लपून-छपून काहीजण वाळू पुरवित आहे. मात्र भाव अव्वाच्या सव्वा दर द्यावा लागत आहे. आता डिझेल तसेच पेट्रोलचे दर वाढल्या साहित्याचे दरही गगनाला भिडले आहेत.