कोरोना संसर्गाने आजपर्यंत ४६० पुरुषांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:35+5:302021-04-21T04:28:35+5:30
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटाने दहशत माजविली आहे. दरम्यान, एक ते दीड महिन्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ ...
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटाने दहशत माजविली आहे. दरम्यान, एक ते दीड महिन्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून सध्या तर बिकट परिस्थिती आहे. मागील वर्षभरापासून कोरोनाने ४६० पुरुषांचा तर १६२ महिलांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, ३० ते ४० वयोगटातील ४२ जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:सह इतरांची काळजी घेणे सध्या तरी अत्यावश्यक झाले आहे.
मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असून मृत्युदरही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, काही नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी दाखल होत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकत नसल्यामुळेच मृत्युदर वाढत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी वेळीच लक्ष देऊन औषधोपचार घेतल्यास कोरोनाच्या संकटातून मुक्त होता येते. मात्र नागरिक आजही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे आता प्रशासनाने कठोर होऊन कारवाई करणे गरजेचे आहे. नाही तर आणखी कोरोनाचा उद्रेक वाढून या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
कोरोनाबाधित
पुरुष २६६८६
महिला १६७५८
बाॅक्स
६० च्या वरील मृतांची संख्या अधिक
जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत कोरोना मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून ती ३२४ वर जाऊन पोहोचली आहे. तर ३० ते ४० वयोगटातील मृत्यू ४२ एवढे आहेत. विशेष म्हणजे, ५० ते ६० वयोगटातील मृत्यूचे प्रमाण २७.६५ टक्के एवढे आहे. यामध्ये पुरुष १२६ तर ४६ महिलांचा समावेश आहे. या वयोगटातील नागरिक जास्तीत जास्त बाहेर फिरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांचा मृत्युदर अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
बाक्स
वयोगटानुसार मृत्यूचे प्रमाण
वर्ष पुरुष महिला
३० ते ४० ३३ ९
४० ते ५० ६७ १७
५० ते ६० १२६ ४६
६० ते त्यापुढे २३४ ९०
एकूण ४६० १६२