कोरोना संसर्ग वेग उसळी घेण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:15+5:302021-07-17T04:23:15+5:30
जिल्ह्यात २४ तासांत २३ जणांनी कोरोनावर मात केली, तर १७ नवे पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला ...
जिल्ह्यात २४ तासांत २३ जणांनी कोरोनावर मात केली, तर १७ नवे पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. बाधित आलेल्या १७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील १, चंद्रपूर तालुका २, बल्लारपूर ९, गोंडपिपरी १, राजुरा २, कोरपना १ व जिवती तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, चिमूर, वरोरा तालुक्यात शुक्रवारी एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ८९९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार २२४ झाली आहे. सध्या १४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ८९ हजार ८३३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख १ हजार ९४६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १,५३३ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्क वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे, या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच पात्र सर्व नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.