५१ हजार ८२५ सुपर स्प्रेडरची होणार कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:30 AM2021-02-24T04:30:13+5:302021-02-24T04:30:13+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर अडचणी वाढू शकतात. ...

Corona inspection of 51 thousand 825 super spreaders | ५१ हजार ८२५ सुपर स्प्रेडरची होणार कोरोना तपासणी

५१ हजार ८२५ सुपर स्प्रेडरची होणार कोरोना तपासणी

Next

चंद्रपूर जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर अडचणी वाढू शकतात. त्यामुळे जि. प. आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील तीन महिन्यांसाठी औषधी मागावी, अशा सूचना दिल्याचे जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ९ हजार ४२२ जणांची कोरोना चाचणी झाली. त्यापैकी एक लाख ९५२ आरटीपीसीआर तर एक लाख ४ हजार ४७० अ‍ॅन्टीजने चाचण्यांचा समावेश आहे. यापैकी २९ हजार ४२२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. ३९७ जणांचे मृत्यू झाले. यातील ३८ जण जिल्ह्याबाहेरील आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.

६४ टक्के कोरोना लसीकरण

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाठी नोंदणी केलेल्यांपैकी सोमवारपर्यंत ६४ जणांनी लसीकरण केले. कर्मचाऱ्यांची मानसिकता तयार झाल्याने लसीकरणाचा वेग आता दररोज वाढत आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर बाधितांची संख्या वाढेल, याकडेही जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी लक्ष वेधले.

Web Title: Corona inspection of 51 thousand 825 super spreaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.