कोरोनाने सहा जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:46+5:302021-06-09T04:35:46+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. असे असले तरी २४ तासांमध्ये ६ जणांचा कोरोनाने ...
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. असे असले तरी २४ तासांमध्ये ६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ६३ नव्या बाधितांची यामध्ये भर पडली आहे. तर १७१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सुटी देण्यात आली आहे.
बाधित आलेल्या ६३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ०८, चंद्रपूर तालुका ०४, बल्लारपूर १७, भद्रावती ०२, ब्रह्मपुरी ०६ , नागभिड ०४, सिंदेवाही ०४, मूल ०४, सावली ०२, पोंभुर्णा ०६, गोंडपिपरी १, राजुरा १, चिमूर १, वरोरा २, कोरपना, जिवती इतर ठिकाणच्या १ रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वाॅर्ड, रमाबाईनगर येथील ५३ वर्षीय पुरुष, श्रीराम वाॅर्ड घुगुस येथील ७१ वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष व ८४ वर्षीय महिला, मूल तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष तर एकतानगर माजरी येथील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बाॅक्स
आजपर्यंत ८३ हजार ६४९ रुग्णसंख्या
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ६४९ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८० हजार ७०४ झाली आहे. सध्या १ हजार ४६० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ९५ हजार ६५९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख ८ हजार ६१० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८५ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३७५, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३९, यवतमाळ ५१, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.