कोरोनाने जगण्याची उमेद घालवली; दीड वर्षात ३४ जणांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:31 AM2021-08-12T04:31:49+5:302021-08-12T04:31:49+5:30
मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परिणामी, अनेक छोट्या- मोठ्या कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची ...
मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परिणामी, अनेक छोट्या- मोठ्या कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अनेकांना आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसविता आली नाही. परिणामी, नैराश्यातून जिल्ह्यातील ३४ जणांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. सन २०२० मध्ये २० तर २०२१ जुलै महिन्यापर्यंत १४ जणांनी आत्महत्या केल्याची बाब पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
बॉक्स
गळफास व विष घेण्याऱ्यांची संख्या जास्त
कोरोनाने अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले. आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे अनेकांना नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग निवडला आहे.
मागील दीड वर्षात जिल्ह्यात ३४ जणांनी आत्महत्या केली. सन २०२० मध्ये २०, तर २०२१ मध्ये ३४ जणांनी आत्महत्या केली. यात गळफास व विष घेऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
कोट