पोलिसांना कोरोना साहित्य भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:23+5:302021-05-28T04:21:23+5:30

या माध्यमातून बँकेने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. यापुढेसुद्धा पोलिसांच्या आरोग्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही दिली. सध्या तालुक्यात कोरोना महामारीची दहशत ...

Corona material gift to police | पोलिसांना कोरोना साहित्य भेट

पोलिसांना कोरोना साहित्य भेट

Next

या माध्यमातून बँकेने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.

यापुढेसुद्धा पोलिसांच्या आरोग्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही दिली. सध्या तालुक्यात कोरोना महामारीची दहशत पसरली आहे. आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या जीवघेण्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. नियमांचे काटेकोर पालन व्हावे, याकरिता पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. जीवाची पर्वा न करता जनतेचे हित जोपासत आहे. अशा या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, याकरिता सामाजिक बांधीलकीतून बँकेने त्यांच्याकरिता सॅनिटायझर, फेस शिल्ड, ऑक्सिमीटर भेट दिली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांनी या भेट वस्तू स्वीकारल्या. यावेळी बँकेचे व्यवस्थापक वाराणसी चंद्रशेखर, क्षेत्रीय व्यवस्थापक नीलेश पाटील, शाखा व्यवस्थापक संगम मोंढे, शुभम भगत, समीर टोनपे, निखिल पारेकर हजर होते.

Web Title: Corona material gift to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.