कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:41+5:302021-06-16T04:37:41+5:30

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख कमालीचा घसरला आहे. मृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश आले. मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरमायकोसिस ...

Corona is now on her way back, along with Mukarmycosis | कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर

कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर

Next

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख कमालीचा घसरला आहे. मृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश आले. मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरमायकोसिस हा आजार काहींना जडू लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. या आजारावरील उपचार व औषधी अत्यंत महाग असल्याने राज्य शासनाने महात्मा फुले आरोग्य विमा योजनेत समाविष्ट केला. रुग्णांची संख्या वाढत असताना एम्पोटीसिरीन-बी औषध चंद्रपुरातील कोणत्याही मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंंबीयांना धावाधाव करावी लागत होती. राज्य शासनाने हे इंजेक्शन पुरविण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे दिली. त्यामुळे रुग्णांच्या अडचणी दूर होऊ लागल्या. दरम्यान, कोरोना बाधितांची संख्याही कमी झाली. सद्यस्थितीत म्युकरमायकोसिसच्या ४५ रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाकडे आहे. यापैकी तुकूम येथील क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये १४ रुग्ण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाच तर अन्य रुग्ण चंद्रपुरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणे

सायनसमध्ये नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत काळी बुरशी साठून राहते. नाकातून रक्त येऊ शकते. मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी होते. डबल व्हिजन म्हणजे एखादी गोष्ट दोनदा दिसून येते. रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. मात्र, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी ही बुरशी प्राणघातक ठरू शकते.

अशी घ्या काळजी

अनियंत्रित मधुमेह व स्टेराईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांवर स्टेराईडचा वापर करताना काळजी घ्यावी. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे. कोविड रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे आजारातून बरे झाल्यानंतर सकस आहार घ्यावा, असा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला.

औषधींवर आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण

म्युकरमायकोसिस रुग्णांना इंजेक्शन व औषधी पुरवठा करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दिली. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मागणी नोंदविल्यानंतर उपलब्धतेनुसार इंजेक्शन थेट रुग्णांना पुरविले जात आहे.

तिघांचा मृत्यू ; एकाचा डोळा काढला

चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस झालेल्या तिघा रुग्णांचा मृत्यू झाला तर एकाचा डोळा काढावा लागला. कोरोना बाधितांची संख्या कमी झाली. त्यामुळे म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर लागला आहे; मात्र हा आजार होऊ नये अथवा झाल्यास तातडीने उपचार करण्यासाठी शासकीय व खासगी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत.

कोट

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे सध्या ४५ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इंजेक्शन व औषधांचा तुटवडा नाही;मात्र मागणीनुसारच रुग्णांना उपलब्ध करून दिले जात आहे. कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली. त्यामुळे म्युकरमायकोसिसही कमी होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, नागरिकांनी कोरोना संपला या मानसिकतेत न राहता स्वत:च्या आरोग्याची खबरदारी घ्यावी.

-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

Web Title: Corona is now on her way back, along with Mukarmycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.