कोरोना प्रकोप सुरूच; मृत्यूचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:27 AM2021-04-15T04:27:45+5:302021-04-15T04:27:45+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३६ हजार ७४८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २८ हजार ७८० ...

Corona outbreak continues; Thaman of death | कोरोना प्रकोप सुरूच; मृत्यूचे थैमान

कोरोना प्रकोप सुरूच; मृत्यूचे थैमान

Next

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३६ हजार ७४८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २८ हजार ७८० झाली आहे. सध्या ७४३९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख १२ हजार ४४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ६९ हजार ९७३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

असे आहेत मृतक

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील ३५ व ४५ वर्षीय पुरुष, तसेच श्रीराम वाॅर्ड येथील ७० वर्षीय महिला, झाकीर हुसेन वाॅर्ड बल्लारपूर येथील ५५ वर्षीय पुरुष, बामणी बुधोली बल्लारपूर येथील ७२ वर्षीय पुरुष, मूल येथील ४६ वर्षीय पुरुष, वरोरा शहरातील ४५ वर्षीय पुरुष, भिसी चिमूर येथील ४५ वर्षीय पुरुष, चिमूर येथील ५५ वर्षीय महिला, जिवती येथील ४५ वर्षीय महिला, अहेरी येथील ६० वर्षीय महिला, जुमाठा वाॅर्ड वरोरा येथील ७० वर्षीय पुरुष, केमिकल वाॅर्ड घुग्गुस येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५२९ बाधितांचा मृत्यू झाला. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ४८३, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली २१, यवतमाळ २०, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

चंद्रपुरात ३०७ व वरोऱ्यात २१९ पॉझिटिव्ह

आज बाधित आलेल्या १२३५ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ३०२, चंद्रपूर तालुका ८७, बल्लारपूर ८३, भद्रावती १००, ब्रह्मपुरी ९८, नागभीड ३९, सिंदेवाही २३, मूल २२, सावली आठ, पोंभुर्णा सहा, गोंडपिपरी चार, राजुरा ३०, चिमूर १५२, वरोरा २१९, कोरपना २३, जिवती १७ व इतर ठिकाणच्या २२ रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Corona outbreak continues; Thaman of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.