कोरोना रुग्ण दहा हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:00 AM2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:01+5:30
जिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ९९, पोंभूर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील १२, चिमूर तालुक्यातील पाच, मूल तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ, नागभीड तालुक्यातील सहा, वरोरा तालुक्यातील २२, भद्रावती तालुक्यातील पाच, सावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील २१, गडचिरोली येथील तीन असे एकूण १९७ बाधित पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी दहा हजारांचा आकडा पार केला आहे. मंगळवारच्या नव्या १९७ बाधितांना पकडून एकूण रुग्णसंख्या दहा हजार ९ वर पोहचली आहे. यातील पाच हजार ८७६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर तीन हजार ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मागील २४ तासात केवळ एकाच कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मंगळवारी मृत्यू झालेला रुग्ण तुकूम चंद्रपूर येथील ४५ वर्षीय पुरुष असून त्याला कोरोनासह श्वसनाचा आजारा होता.
जिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ९९, पोंभूर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील १२, चिमूर तालुक्यातील पाच, मूल तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ, नागभीड तालुक्यातील सहा, वरोरा तालुक्यातील २२, भद्रावती तालुक्यातील पाच, सावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील २१, गडचिरोली येथील तीन असे एकूण १९७ बाधित पुढे आले आहे.
चंद्रपूर शहर व परिसरातील बाबूपेठ, बालाजी वार्ड, महेश नगर, चोर खिडकी परिसर, समता चौक परिसर, दुर्गापूर, जगन्नाथबाबा नगर, शास्त्रीनगर, नगिनाबाग, आंबेडकर नगर, सिस्टर कॉलनी परिसर, दाताळा, जटपुरा वॉर्ड, भानापेठ वॉर्ड, विश्वकर्मा नगर, महाकाली वार्ड, कोतवाली वार्ड, बापट नगर, आकाशवाणी रोड परिसर, ओमनगर भिवापूर वॉर्ड या भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. जिल्ह्यात चाचण्या वाढविल्या आहेत.
गर्दी टाळण्याची गरज
चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. त्यामुळे आताही गर्दी टाळण्याचीच नितांत गरज आहे.
कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.
कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे.
बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असली तरी कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे.