कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:55+5:302021-07-24T04:17:55+5:30
दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाने कहर केला होता. सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसरी लाट घेण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त ...
दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाने कहर केला होता. सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसरी लाट घेण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पावसाचे दिवस असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. परिणामी, डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोना आणि डेंग्यू या आजाराची लक्षणे सारखीच आहेत; परंतु अनेक जण कोरोनाची तपासणी करून घेतात; परंतु डेंग्यूची तपासणी करीत नाहीत. परिणामी, धोका होण्याची संभावणा असते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, अशी लक्षणे आढळून आल्यास कोरोना आणि डेंग्यूची तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
चाचणी कुठली
कोरोनासाठी रॅपिड अँटिजन, आरटीपीसीआर
डेंग्यूसाठी एनएस १ ॲंटिजन, आयजीजी, आयईएम ॲन्टिबॅाडीज
डेंग्यूचे रुग्ण
२०१९ ४६५
२०२० २०४
२०२१ ४७
बॉक्स
पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा
पावसाळ्यात साधारणत: जलस्रोताद्वारे दूषित पाणी येत असते. त्यामध्ये जंतू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूषित पाण्याला स्वच्छ गाठून त्यात तुरटी फिरवावी, किंवा यंत्राद्वारे शुद्ध करावे. त्यानंतर पाणी उकळावे, नंतर ते थंड करून प्यावे. त्यामुळे पोटाचे आजार होण्यापासून मुक्ती मिळते.
अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवावा. डास चावू नये, म्हणून संपूर्ण अंगभर कपडे घालावे, झोपताना मच्छरदानी लावून झोपावे, तसेच मच्छराचा प्रतिबंध करणारे यंत्र किंवा अगरबत्तीचा वापर करावा.
बॉक्स
सर्दी खोकला व ताप
साधारणत: डेंग्यू आणि कोरोनाची प्राथमिक लक्षणे सारखीच आहेत; परंतु डेंग्यूमध्ये १०४ डिग्रीपर्यंत ताप येतो. डोकेदुखी, स्नायू, हाडे आणि सांधेदुखी, मळमळणे, उलट्या होणे, डोळ्याच्या मागे पुरळ येणे आदी लक्षणे आढळून येतात. तर कोरोनामध्ये सर्दी, खोकला, ताप येणे ही प्राथमिक लक्षणे आढळून येतात. दोन ते तीन दिवस अंगातील ताप हा कमी होतो आणि पुन्हा वाढतो. वास न येणे, कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर चव न येणे आदी लक्षणे आढळून येतात.
कोट