कोरोना टाळेबंदीत साहित्यिकांचा अनोखा उपक्रम ‘कथा कवितेच्या जन्माची‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:05+5:302021-05-25T04:32:05+5:30

गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या १६० व्या जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात झाली. कवितेतील प्रतिमांचे आकलन प्रत्येकाच्या अनुभव विश्वाशी ...

Corona Talebandit's unique initiative 'The Birth of Poetry' | कोरोना टाळेबंदीत साहित्यिकांचा अनोखा उपक्रम ‘कथा कवितेच्या जन्माची‘

कोरोना टाळेबंदीत साहित्यिकांचा अनोखा उपक्रम ‘कथा कवितेच्या जन्माची‘

Next

गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या १६० व्या जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात झाली. कवितेतील प्रतिमांचे आकलन प्रत्येकाच्या अनुभव विश्वाशी जोडलेले असते. त्यामुळे पुष्कळदा आपल्याला आकलन झालेली कविता आणि कवीच्या मनातील भाव भिन्न असू शकतात. प्रत्येक वेळी कवी आपल्याला उपलब्ध असेलच असे नाही म्हणून कवीला कविता कशी सुचते? विशिष्ट कविता सुचण्यामागची कहाणी काय? हे जाणून घेऊन ते रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. युट्युबच्या माध्यमातून दर शनिवार आणि बुधवारी आपल्यासमोर एका कवीची एक कविता, ‘कथा कवितेच्या जन्माची’च्या माध्यमातून प्रत्यक्ष कवीकडूनच ऐकविणार आहोत.

असे आहेत सहभागी कवी

चंद्रपुरातील नाट्यलेखक व कवी श्रीपाद जोशी, किशोर मुगल, पद्मरेखा धनकर, किशोर कवठे, अविनाश पोईनकर, इरफान शेख, देवानंद मेश्राम, प्रदीप देशमुख, गीता रायपूरे, मनोज बोबडे, प्रभाकर धोपटे, उर्मिला टिकले, नरेशकुमार बोरीकर, विजय वाटेकर, किशोर जामदार या कवींच्या प्रत्येकी पाच कविता यामध्ये सादर होणार आहेत.

निर्मितीची संकल्पना

या निर्मितीची संकल्पना व मांडणी किशोर जामदार, संपादन आणि दिग्दर्शन नचिकेत जामदार, छायांकन अमोल मेश्राम व राममिलन सोनकर, ग्राफिक्स विक्रांत नवाथे यांचे आहे. आकार फिल्म्स अ‍ॅन्ड डिजिटलच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम उपलब्ध आहे. दर बुधवारी व शनिवारी एक-एक कविता अपलोड होईल.

कवितेतून संदेश

कविता हा साहित्यातील, मनाला सर्वाधिक भावणारा सर्वांत मृदू व तरल प्रकार होय. एखादी गोष्ट विस्ताराने गद्यात सांगण्यापेक्षा, कवितेतून अधिक पोहोचते. ज्याला साहित्यातील तांत्रिक बाजू काहीही कळत नाही अशा व्यक्तीलाही कविता भावते. रसांची नावेदेखील ज्ञात नसलेली व्यक्तीही त्या रसांचा आस्वाद घेत असते. लहान मूलही कवितेकडे आकर्षित होते. त्यामुळेच ती चटकन लक्षातही राहते.

Web Title: Corona Talebandit's unique initiative 'The Birth of Poetry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.