कोरोनाने शिकविले काॅस्ट कटिंग, किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:10+5:302021-07-12T04:18:10+5:30

चंदपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेल्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न ...

Corona taught cast cutting, cost reduction from kitchen to cutting | कोरोनाने शिकविले काॅस्ट कटिंग, किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात

कोरोनाने शिकविले काॅस्ट कटिंग, किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात

Next

चंदपूर :

कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेल्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. तर काहींना घर खर्च करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे प्रत्येकांनी कमी अधिक प्रमाणात खर्चावर निर्बंध घातले आहे. यात महिलांची भूमिका महत्त्वाची ठरत असून त्यांनी योग्य नियोजन करून कमी खर्चात घर चालविण्याचा मार्ग अवलंबला आहे.

कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. त्यामुळे हातात असलेला पैसा खर्च करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागला. त्यामुळे अतिरिक्त खर्च करणे अनेकांनी टाळले आहे. विशेषत: महिलांनी स्वत:सह कुटुंबालाही बचतीची सवयच लावली आहे. यामध्ये बाहेर फिरण्यासाठी जाणे, हाॅटेलिंग करणे, लग्नसमारंभ इतर कार्यक्रमात हजेरी लावणे, पर्यटन करणे आदी जवळपास थांबविले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची बचत झाली असून घर चालविणे काही प्रमाणात का होईना सुलभ होत आहे. अनेक कुटुंबामध्ये नवीन कपडे, घरातील चैनीच्या वस्तू खरेदी करणेही थांबविल्या आहे. मोबाइल डाटा, पेट्रोल, डिझेल, टीव्ही रिचार्ज आदी खर्च वाचविला आहे. एकूणच काटकसरीतून घर चालवून कोरोना संकटाचा काळ अनेकांनी काढला आहे.

बाॅक्स

कुठे कुठे केली काॅस्ट कटिंग

वीज बिलामध्ये बचत करण्यात आली.

अनेकांच्या घरचे लँडलाइन फोन बंद

सलूनमध्ये न जाता घरीच दाढी

प्र‌वास करण्यावरही निर्बंध

अनावश्यक खरेदी बंद

समारंभात उपस्थित राहणेही बंद

बाहेर खाण्याचा खर्च कमी केला

बाॅक्स

लाॅकडाऊनपूवी प्रवास, समारंभावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात होता. मात्र आता प्रवासावर निर्बंध आणण्यात आले असून लग्न तसेच इतर समारंभातही अत्यावश्यक असेल तरच हजेरी लावली जात आहे.

पूर्वी आठवड्यातून सुटीच्या दिवशी खरेदी तसेच बाहेर जेवण करण्यासाठी अनेक जण जात होते. मात्र आता अनके जण घरीच जेवण करण्याला पसंती देत असून बाहेर फिरणेही बंद झाले आहे. त्यामुळे खर्च कमी होत आहे.

मोबाईल डाटा, वीज बिल, टीव्ही रिचार्ज वर अनावश्यक खर्च होत होता. आता हे खर्च कमी करण्यात आले आहे. गॅस सिलिंडरचाही जपून वापर केला जात आहे.

कोट

अनावश्यक खर्च टाळला

लाॅकडाऊन पूर्वी थोडाफार खर्च करीत होते. मात्र आता अनावश्यक खर्च करण्यावर मर्यादा आल्या आहे.नवीन कपडे घेणे, बाहेर फिरणे, हाॅटेलमध्ये जाणे जवळपास बंद केले असून यातून खर्च वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुटुंबासह स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहे.

-प्रतिभा कोडापे, चंद्रपूर

कोट

स्वत:चे काम स्वत:च करणे सुरू

लाॅकडाऊनपूर्वी आठवड्याचा भाजीपाला घेत होती. यामध्ये अनेकवेळा भाज्या खराब झाल्यास फेकून देण्यात येत होत्या. आता मात्र दररोजची भाजी दररोज घेत आहे. मुलांनाही स्वत:चे काम स्वत: करण्याची सवय लावली. कपडे, भांडी खरीच घासणे सुरू केले.

ममता खोब्रागडे,चंद्रपूर

कोट

लाॅकडाऊनमु‌ळे बचत करण्याची सवय लावली. पूर्वी हाॅटेल बाहेर फिरणे, पर्यटन यावर मोठा खर्च होत होता. मात्र आता या सर्वावर घरीच निर्बंध घातले आहे. अनावश्यक न फिरता काम असेल तर वाहन बाहेर काढल्या जात आहे. यामध्ये पेट्रोलसुद्धा वाचत आहे.

-ललिता गेडाम, चंद्रपूर

Web Title: Corona taught cast cutting, cost reduction from kitchen to cutting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.