कोरोनामुळे जिल्ह्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांना तात्पूरता ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:52+5:30

मार्च महिन्यांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर शासनाने लॉकडाऊन केले. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शासकीय रुग्णालयाचा भारही वाढत आहेत. आरोग्य विभागात आजही पाहिजे तेवढे मनुष्यबळ नसल्याने कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया सध्यास्थितीत प्रभावित झाल्या आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कमाला लागली आहे.

Corona temporarily breaks family welfare surgeries in district | कोरोनामुळे जिल्ह्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांना तात्पूरता ‘ब्रेक’

कोरोनामुळे जिल्ह्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांना तात्पूरता ‘ब्रेक’

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण : प्रतिबंधात्मक साधणांच्या वापरासाठी जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासकीय आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधितांच्या उपचारार्थ दाखल आहे. त्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित झाल्या आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेवरही याचा परिणाम पडला असून त्या शस्त्रक्रिया तात्पुरत्या थांबविण्यात आल्या आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक सांधणांचा वापर करण्यासंदर्भात आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे.
मार्च महिन्यांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर शासनाने लॉकडाऊन केले. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शासकीय रुग्णालयाचा भारही वाढत आहेत. आरोग्य विभागात आजही पाहिजे तेवढे मनुष्यबळ नसल्याने कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया सध्यास्थितीत प्रभावित झाल्या आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कमाला लागली आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यात ८१७ वर रुग्णसंख्या पोहचली आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयासह, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियाही प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये विविध प्रतिबंधात्मक साधणांच्या वापरासंदर्भात जनजागृती केली जात आहे.
यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यासोबत संपर्क साधला असता, आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्यामुळे काही दिवसांसाठी शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या मात्र त्या बंद करण्यात आल्या नाही. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया सामान्यत: उन्हाळा आणि पावसाच्या दिवसामध्ये टाळल्या जातात. त्यामुळे तेवढा फरक पडला नाही.येत्या काही दिवसामध्ये शस्त्रक्रिया पुन्हा सुरु केल्या जातील, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या असल्या तरी खासगी रुग्णालयात मात्र त्या सुरुच आहे. त्यामुळे काही महिला खासगी रुग्णालयात दाखल होऊन शस्त्रक्रिया करीत आहे. यात मात्र आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

गावागावात जनजागृती
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सेवेवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्याचा परिणाम प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवर होत आहे. दरम्यान, उपाययोजना म्हणून वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर तसेच आरोग्य कर्मचारी प्रतिबंधात्मक साधणांचा वापर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे.आरोग्य विभागाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया थांबविल्यामुळे तांबी, गर्भनिरोधक गोळ्या व अन्य साधनांचा वापर वाढला आहे.

कोरोनामुळे आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळे बहुतांश वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी या कामात गुंतले आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंद केले नसून काही प्रमाणात त्यावर परिणाम पडला आहे. येत्या काही दिवसात पुन्हा शस्त्रक्रिया करणे सुरु करण्यात येणार आहे.
- संदीप गेडाम
माता व बाल संगोपन
अधिकारी, चंद्रपूर

Web Title: Corona temporarily breaks family welfare surgeries in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.