खासगी रुग्णालयातील कोरोना लसीकरण लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:19+5:302021-03-04T04:52:19+5:30
(दि.२) तातडीने खासगी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे सोमवारपासून लसीकरणाची शक्यता आहे. ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील नागरिकांचे कोरोना ...
(दि.२) तातडीने खासगी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे सोमवारपासून लसीकरणाची शक्यता आहे.
४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी को-वीन अॅप, आरोग्य सेतू अॅप किंवा संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. ही अॅप प्रत्येक प्ले स्टोअरवर असून त्याची लिंक डिजीलॉकरवर उपलब्ध आहे. केंद्र शासनाने खासगी केंद्रात लसीच्या एक डोजकरिता २५० रूपये शुल्क ठरविल्याने काही ज्येष्ठांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. मात्र, ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद कोविड हॉस्पिटल, चंद्रपुरातील मुसळे चिल्ड्रन व क्राइस्ट हॉस्पिटल या तीन केंद्रांनी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्याने लसीकरण होऊ शकले. शहरातील संजीवनी हॉस्पिटल, बुक्कावार हार्ट अॅण्ड क्रिटिकल केअर हॉस्पिटल, वासाडे हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी रविवार (दि.७ मार्च )पर्यंत वेळ मागवून घेतली. त्यामुळे सोमवारपासून सर्व सातही खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.
तांत्रिक अडचणींचा घोळ कायम
लसीकरणासाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ॲपवर नोंदणी झाली नाही तर संबंधित पुरावे सादर करून थेट केंद्रात लसीकरण करता येते. मात्र, ज्यांना ॲपवर नोंदणीशिवाय पर्याय नाही, अशा व्यक्तींसाठी त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, मंगळवारी शासकीय केंद्रात किती ज्येष्ठांचे लसीकरण झाले, याची माहिती रात्री उशिरापर्यंत जिल्हा आरोग्य प्रशासनाने उपलब्ध करून दिली नाही.
खासगी डॉक्टरांचे प्रशिक्षण पूर्ण
कोरोना लसीकरणासाठी मान्यता दिलेल्या खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आज जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्रशिक्षण दिले. लसीकरण होणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पाच प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, व्हॅक्सिन स्टोअर व व्हॅक्सिन करिअर तसेच अन्य सुविधा अत्यावश्यक आहेत. शिवाय, अन्य आरोग्य सुविधांचाही उपलब्धता पूर्ण करण्याच्या सूचना प्रशिक्षणात देण्यात आल्या.