प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:34+5:302021-03-13T04:51:34+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा येथे १० मार्चपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. वासेरा येथील सरपंच महेश पाटील बोरकर यांच्या ...
प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा येथे १० मार्चपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले.
वासेरा येथील सरपंच महेश पाटील बोरकर यांच्या हस्ते लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा येथील लसीकरणप्रसंगी सिंदेवाही पंचायत समितीच्या उपसभापती शीलाताई कन्नाके, प्राथमिक आरोग्य केंद्र वासेराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल गेडाम, माधुरी बोडणे, लक्ष्मी नैताम, गणेश मडावी, उमेश उईके आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वासेराचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मागासवर्गीय हायस्कूल वासेराचे मुख्याध्यापक रतन चव्हाण यांनी लसीचा शुभारंभ केला. मागासवर्गीय हायस्कूल वासेराचे सर्व कर्मचारी, सीताबाई हायस्कूल शिवनीचे कर्मचारी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वासेरा व शिवनीचे सर्व शिक्षक यांनीसुद्धा लस घेतली.
पहिल्या दिवशी १३० ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घेतले.