राजोली परिसरात कोरोना लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:06+5:302021-04-05T04:25:06+5:30
मूल : जिल्ह्यात कोरोना रुग्णांत सतत वाढ होत असल्याने प्रशासनाने नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मूल तालुक्यातील ...
मूल : जिल्ह्यात कोरोना रुग्णांत सतत वाढ होत असल्याने प्रशासनाने नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मूल तालुक्यातील राजोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोली येथे कोरोना लसीकरण मोहिमेला रविवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविली आहे. त्यासोबतच कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, मूल तालुक्यातील राजोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राजोली ग्रामपंचायतचे सरपंच जितेंद्र लोणारे, माजी सरपंच आनंदराव ठिकरे, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन वल्केवार, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अश्विनी गोरे, रुग्ण कल्याण समितीचे चंदू नामपल्लीवार, विजय पाकमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले. लसीकरण करण्याच्या ठिकाणी नागरिकांची नोंदणी करून लसीकरण करण्यात आले. शेकडो नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. नागरिकांनीही यावेळी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.