घरात बसूनच घेता येणार आता कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:59+5:302021-09-23T04:31:59+5:30

चंद्रपूर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या आहे. जे नागरिक केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत ...

Corona vaccine can now be taken at home | घरात बसूनच घेता येणार आता कोरोना लस

घरात बसूनच घेता येणार आता कोरोना लस

Next

चंद्रपूर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या आहे. जे नागरिक केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत, अशा दिव्यांग, ६० वर्षांवरील वयोवृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींसाठी सोमवारपासून ‘लसीकरण आपल्या दारी’उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मनपाच्या नियमित लसीकरण समन्वय समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीत महानगरपालिका क्षेत्रातील सात आरोग्य केंद्रांमध्ये झालेले एकूण लसीकरण आणि प्रतिकारक्षमता वर्धन (तान्ही बाळे) यांचा पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे आढावा घेतला. कोरोना लसीकरण आणखी वाढविण्याचे उपाय, नागरिकांच्या डोक्यातील समज -गैरसमज दूर करण्याविषयी यावेळी चर्चा झाली.

महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून फिरत्या लसीकरणावर अधिक भर असणार आहे, अशी माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी बैठकीत दिली. बैठकीला मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अतुल चटकी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Corona vaccine can now be taken at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.