कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:05+5:302021-06-16T04:38:05+5:30
हरिभाऊ पाथोडे : संकटकाळात अंधश्रद्धा पसरवू नका सिंदेवाही : कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण ...
हरिभाऊ पाथोडे : संकटकाळात अंधश्रद्धा पसरवू नका
सिंदेवाही : कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाली, असा दावा करणारी बुवाबाजी सध्या सगळीकडे धुमाकूळ घालते आहे. शरीराला स्टीलचे चमचे, वाट्या, ताटे चिकटतात, असा त्यांचा दावा फोल असून कोरोना संकटकाळात अशा अंधश्रद्धा पसरू नका, असे आवाहन अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले.
कोरोना लस ही कोरोनावर आळा घालण्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे शरीरात चुंबकीय शक्ती वगैरे निर्माण होत नाही. आपल्या शरीरातून घाम येतो आणि तो त्वचेवर साचतो. या घामामध्ये ‘सिबम’ हा चिकट द्राव असतो. हा सिबम चिकट असतो आणि त्वचेवर चिकचिकपणा निर्माण करतो. त्यामुळे केवळ धातूंच्याच नव्हे तर प्लास्टिकच्या वस्तूदेखील त्याला चिकटतात. ज्या व्यक्तींच्या त्वचेवर हा सिबम पसरलेला असतो. तेथे या वस्तू चिकटतात. हा सिबम जर तिथून काढून टाकला तर वस्तू चिकटायच्या थांबतात. ज्यांचे त्वचेवर केस नाहीत अशांना या सिबम चिकट द्रवाचा खूप मोठा फायदा होतो आणि वस्तू पटकन चिकटतात. तुमच्या आसपास जर असे कोणी चमत्काराचा दावा करून दाखवू लागले तर तुम्ही त्याच्या अंगाला पावडर फासा आणि वस्तू चिकटवून दाखव, असे सांगा तसेच शरीरात चुंबकीय क्षेत्र असेल तर हाताच्या बोटाने खाली पडलेला चमचा स्पर्श करून उचलून दाखवायला सांगा. अशा प्रकारे त्याचा भांडाफोड कोणीही करू शकेल आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे षङ्यंत्र थांबवता येईल, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे.
===Photopath===
140621\img-20210614-wa0025.jpg
===Caption===
कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत नाही! - हरिभाऊ पाथोडे