Corona Virus : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1180 जण कोरोनामुक्त, तर 641 पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 08:25 PM2021-05-19T20:25:24+5:302021-05-19T20:26:03+5:30

Corona Virus in Chandrapur district : सध्या 7 हजार 821 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 42 हजार 937 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 60 हजार 327 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

Corona Virus: In Chandrapur district in last 24 hours 1180 people were corona free, while 641 were positive! | Corona Virus : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1180 जण कोरोनामुक्त, तर 641 पॉझिटिव्ह!

Corona Virus : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1180 जण कोरोनामुक्त, तर 641 पॉझिटिव्ह!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 79 हजार 150 वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 70 हजार 15 झाली आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 1180 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 641 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून 13 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 79 हजार 150 वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 70 हजार 15 झाली आहे. 

सध्या 7 हजार 821 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 42 हजार 937 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 60 हजार 327 नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील  89 वर्षीय महिला , विद्यानगर वार्ड येथील 59 वर्षीय पुरुष, 43, 63 व 75 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, घुगुस येथील 44 वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील टेंबूरवाही येथील 55 वर्षीय महिला. सिंदेवाही तालुक्यातील 41 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील 30 वर्षीय महिला. कोठारी येथील 60 वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील उमरी येथील 67 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1314 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1217 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 44, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आलेल्या 641 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 169, चंद्रपूर तालुका 31, बल्लारपूर 71, भद्रावती 76, ब्रम्हपुरी 08, नागभिड 24, सिंदेवाही 27, मूल 28, सावली 17, पोंभूर्णा 15, गोंडपिपरी 16, राजूरा 54, चिमूर 04, वरोरा 34, कोरपना 45, जिवती 14 व इतर ठिकाणच्या 08 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Corona Virus: In Chandrapur district in last 24 hours 1180 people were corona free, while 641 were positive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.